शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी आत्मीयता निर्माण होऊन, ते स्वच्छतादूत व्हावेत, यासाठी ‘पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पा’ची कल्पना आर्या यांना सुचली. राज्य सरकारने त्यांच्या कल्पनेचे रुपांतर योजनेत करून त्यांना काम दिले. परंतु त्यांच्या कामाचा योग्य मोबदला न दिल्याने त्यांनी अनेक वेळा आंदोलने केली. अखेर १७ मुलांना डांबून ठेवून त्यांनी सरकारचे लक्ष्य आपल्याकडे आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांच्या झालेल्या चकमकीत त्याचा मृत्यू झाला.
advertisement
त्याचा स्वभाव हट्टी, पैसे दिले होते पण...
दीपक केसरकर यांना याप्रकरणी अधिक विचारले असता, दोन कोटी पैसे थकल्याचे मला अजिबात वाटत नाही. त्याने जेवढे काम केले, तेवढे पैसे दिल्याचे आमच्या विभागाने सांगितले होते. मी काही पैसे चेकने दिले होते, पुन्हा अडचण निर्माण होऊ नये चेकने व्यवहार केला. परंतु त्याचा हट्टी स्वभाव होता त्यामुळे हा प्रकार घडला असेल, असे केसरकर म्हणाले.
सरकारी नियम तोडून तर पैसे देऊ शकत नाही ना...
तसेच रोहित आर्य याच्या दाव्यानुसार केसरकर यांनी अनेक भेटी टाळल्या. यावर त्यांना विचारले असता, भेटी नाकारल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत. त्याला मदत केल्याचे माझ्याकडे पुरावे आहेत. पण सरकारी नियम तोडून तर पैसे देऊ शकत नाही. मला एवढेच पैसे पाहिजेत म्हणून त्यांनी हट्ट केला, असे केसरकर म्हणाले.
रोहित आर्यने शाळकरी मुलांना स्वच्छतेची गोडी लावली होती
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितल्यानुसार रोहित आर्यने पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्प स्वखर्चाने राज्यातील शाळांमध्ये २०२२ मध्ये राबविण्यास सुरुवात केली. या प्रोजेक्टमुळे शाळांचा परिसर स्वच् राहू लागला. रोहित आर्यची दखल घेऊन शालेय शिक्षणमंत्री म्हणून केसरकर यांनी सरकारी निर्णय प्रसिद्ध केले. त्यानंतर हा प्रकल्प राबविण्यासाठी शिक्षण विभागाने २०२३ मध्ये काही प्रमाणात आर्थिक सहाय्य केल्याचे आर्या यांनी सांगितले. परंतु त्यानंतर केलेल्या कामाचे पैसे सरकारने दिले नाही. तब्बल २ कोटी रुपये थकविल्याचे त्याचे म्हणणे होते.
