मक्याच्या दरात सुधारणा
राज्याच्या कृषीमार्केटमध्ये आज एकूण 12 हजार 126 क्विंटल मक्याची एकूण आवक झाली. यापैकी नाशिक मार्केटमध्ये 2699 क्विंटल मक्याची सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 1400 ते जास्तीत जास्त 2142 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजार भाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 180 क्विंटल मक्यास 2800 ते 3500 रुपये दरम्यान सर्वाधिक भाव मिळाला.
advertisement
कांदा उच्चांकी आवक
राज्याच्या मार्केटमध्ये 1 लाख 74 हजार 126 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 68 हजार 478 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 441 ते जास्तीत जास्त 1860 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच सोलापूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 1202 क्विंटल पांढऱ्या कांद्यास प्रतीनुसार 200 ते 3000 रुपये दरम्यान बाजार भाव मिळाला.
सोयाबीन आवक
राज्याच्या मार्केटमध्ये 49 हजार 594 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. यापैकी लातूर मार्केटमध्ये सर्वाधिक 23 हजार 844 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3967 ते 4439 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच नाशिक मार्केटमध्ये 1480 क्विंटल सोयाबीनची आवक होऊन त्यास 4396 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.





