ट्रॅक्टरच्या टायरची लाईफ कशी वाढवायची? ५ सोप्या ट्रिक्स वापरा अन् हजारो रुपयांचा खर्च टाळा
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Tractor Tips : ग्रामीण भागात ट्रॅक्टर हा शेतकऱ्यांचा सर्वात महत्त्वाचा साथीदार असतो. शेतीकाम, मालवाहतूक किंवा बांधकाम प्रत्येक ठिकाणी ट्रॅक्टरची भूमिका महत्त्वाची आहे.
मुंबई : ग्रामीण भागात ट्रॅक्टर हा शेतकऱ्यांचा सर्वात महत्त्वाचा साथीदार असतो. शेतीकाम, मालवाहतूक किंवा बांधकाम प्रत्येक ठिकाणी ट्रॅक्टरची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र, ट्रॅक्टरच्या टायरांची किंमत मोठी असल्याने त्यांची काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे. चुकीच्या वापरामुळे टायर लवकर झिजतात आणि शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. म्हणूनच आज आपण ट्रॅक्टरच्या टायरची लाईफ वाढवण्यासाठी ५ सोप्या टिप्स जाणून घेणार आहोत.
1) योग्य एअर प्रेशर राखा
टायरची आयुष्य वाढवण्यासाठी सर्वात पहिला आणि महत्त्वाचा नियम म्हणजे हवेचा योग्य दाब राखणे.जर हवा कमी असेल तर टायरचा तळ जास्त घासला जातो आणि पकड कमी होते. तसेच जर हवा जास्त असेल तर टायरचा मध्यभाग झिजतो आणि वाहन उड्या मारते.शेतात काम करताना आणि रस्त्यावर चालवताना हवा दाब वेगळा ठेवावा. शेतकामासाठी थोडा कमी आणि रस्त्यावर चालवताना थोडा जास्त हवा दाब योग्य ठरतो. आठवड्यातून एकदा तरी टायर प्रेशर तपासा.
advertisement
2) ट्रॅक्टरचे ओव्हरलोडिंग टाळा
अनेक वेळा शेतकरी ट्रॉलीत जास्त वजन भरतात, ज्यामुळे टायरवर प्रचंड ताण येतो. सतत ओव्हरलोडिंग केल्यास टायरच्या साईडवॉल्सवर क्रॅक पडतात आणि टायर लवकर फुटतो. नेहमी कंपनीने सुचवलेले वजन मर्यादेपर्यंतच माल वाहून न्यावा. जास्त वजनामुळे इंजिन आणि ब्रेक सिस्टमवरही दबाव येतो, त्यामुळे एकूणच ट्रॅक्टरची कार्यक्षमता कमी होते.
3) ट्रॅक्टरचा योग्य अलाईनमेंट आणि बॅलन्सिंग ठेवा
टायर असमानरीत्या झिजण्याचं प्रमुख कारण म्हणजे व्हील अलाईनमेंट चुकीची असणे.
advertisement
ट्रॅक्टर शेतात आणि रस्त्यावर दोन्ही ठिकाणी वापरला जात असल्याने टायर बॅलन्सिंग बिघडू शकतं.प्रत्येक ६ महिन्यांनी अलाईनमेंट तपासणे आवश्यक आहे. यामुळे टायरचे सर्व भाग समान प्रमाणात झिजतात आणि आयुष्य २० ते २५ टक्क्यांनी वाढते.
4) ड्रायव्हिंगची पद्धत बदला
चुकीच्या ड्रायव्हिंग सवयींमुळे टायर लवकर खराब होतात. अचानक ब्रेक लावणे, वेगाने वळणे किंवा अनियमित वेगाने चालवणे टायरला ताण देते. शेतातील दगड, मातीचे ढिगारे किंवा धारदार वस्तूंपासून दूर राहा.ट्रॅक्टर चालवताना स्थिर वेग आणि सौम्य वळणं घेतल्यास टायरवरचा ताण कमी होतो.
advertisement
5) टायरची नियमित साफसफाई आणि देखभाल करा
शेतीतील चिखल, पाणी आणि तेलाचे अवशेष टायरच्या रबरला नुकसान पोहोचवतात.
प्रत्येक वापरानंतर टायर स्वच्छ पाण्याने धुवून वाळू द्या. सूर्यप्रकाशात ट्रॅक्टर लांब वेळ उभा ठेवू नका, कारण उष्णतेमुळे रबर कठीण होते. न वापरताना ट्रॅक्टर सावलीत उभा करा आणि टायर थोडे फुगवून ठेवा.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 30, 2025 1:55 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
ट्रॅक्टरच्या टायरची लाईफ कशी वाढवायची? ५ सोप्या ट्रिक्स वापरा अन् हजारो रुपयांचा खर्च टाळा


