राज्याच्या कानाकोपऱ्यात झळकलेल्या या जाहिरातीची सर्वदूर चर्चा आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर झुकून वंदन करतानाचा मुख्यमंत्र्यांचा हा फोटो लक्षवेधी ठरतोय. महत्त्वाचं म्हणजे या जाहिरातीत देवाभाऊ ही चार अक्षरं वगळता दुसरा कोणताही मजकूर नाही. पण असे असले तरी राज्यात अनेकजण या फोटोमागे दडलेल्या बिटवीन द लाईन्सचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतायेत.
advertisement
कारण देवाभाऊ या कॅम्पेनला किनार आहे ती मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या सांगतेची. सरकारने जीआर काढून या संवेदनशील आंदोलनावर यशस्वी तोडगा काढल्याची चर्चा आहे. आणि कुठेतरी त्याचचं श्रेय या जाहिरातीमधून फडणवीस यांना देण्याचा प्रयत्न आहे का याचा अंदाज बांधला जाऊ लागलाय. त्यामुळे ही जाहिरात देणारा देवाभाऊंचा लाडका हितचिंतक कोण या प्रश्नाचं उत्तर अनेकांना हवंय.
महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासूनच सरकारमधल्या कुरबुरींची जाहीर चर्चा होतेय. हे सरकार ट्रिपल इंजिन असल्याचं सर्वजण अगदी ठामपणे सांगतात. पण देवाभाऊ कॅम्पेननंतर या तिन्ही इंजिनांचा कंट्रोल नेमका कुणाकडे आहे हे सांगण्य़ाचा सायलेंट प्रयत्न केल्याचा अनेकांचा अंदाज आहे. मराठा आंदोलनाच्या धगीचा सर्वाधिक फटका मुख्यमंत्र्यांना बसेल असा अंदाज व्यक्त होत होता. पण आंदोलनावर यशस्वी तोडगा काढून फडणवीस एकप्रकारे तावून सुलाखून बाहेर पडले. इतकंच नाही तर राज्यातलं स्वतःच ग्राऊंड त्यांनी आणखी पक्कं केल्याचंही बोललं जातंय. आणि त्याचचं रिल्फेक्शन म्हणजे देवाभाऊ कॅम्पेन असल्याचा अंदाज आहे
पण या देवाभाऊ कॅम्पेनवर सर्वाधिक आक्षेप घेतलाय तो विरोधकांनी. या कॅम्पेनचा स्त्रोत आणि त्यावर झालेल्या खर्चावरुन विरोधकांनी आक्रमकपणे सवाल उपस्थित करायला सुरुवात केलीये. तर विरोधकांची या कॅम्पेनवरुन होणारी टीका परतवून लावताना भाजपाने आपल्या भात्यातली विशेष अस्त्र बाहेर काढली
राजकारणात स्पर्धा ही नेहमी वर्चस्वाची असते. आतल्या आणि बाहेरच्याही विरोधकांना पुरून उरत जो आपलं नाणं खणखणीतपणे वाजवतो तोच चाणाक्ष मानला जातो. राज्यातल्या सध्याच्या सत्तासंघर्षात देवेंद्र फडणवीसांना अगदी असचं आपलं स्थान अधोरेखित केलं आहे का? याचीच जोरदार चर्चा आहे.