देवेंद्र फडणवीस यांना भाजपने पुन्हा संधी का दिली? याची ठळक 10 कारणे आहेत, जाणून घ्या फडणवीसांच्या निवडीसाठी महत्त्वाची ठरलेली कारणं...
या कारणांमुळे देवेंद्र फडणवीसांची निवड :
- देवेंद्र फडणवीस यांनी मागील महायुतीच्या सरकारमध्ये अडीच वर्ष संयमाने उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. देवेंद्र फडणवीस त्याआधी मुख्यमंत्री होते. मात्र, त्यांनी पक्षाचा आदेश म्हणून ही जबाबदारी पार पाडली.
- फडणवीस यांनी कायमच पक्षाची शिस्त पाळली. पक्षाने ठरवलेली रणनीती, निर्णय अंमलात आणण्याचे काम केले. पक्षाने घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात त्यांनी कधीही वक्तव्य केले नाही.
- विकासाचे मुद्दे मांडत असताना देवेंद्र फडणवीस यांनी हिंदुत्ववादी भूमिका कायम ठेवली. निवडणुकीच्या प्रचारात त्यांची ही भूमिका दिसून आली.
- फडणवीसांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही भक्कम पाठबळ मिळाले.
- सलग तीन निवडणुकीत भाजपला 100 हून अधिक जागा मिळवून देण्यात यशस्वी देवेंद्र फडणवीस यशस्वी झाले. ही कामगिरी राज्याच्या राजकारणात दुर्मिळ आहे. आघाडीचे राजकारण सुरू झाल्यानंतर अशी कामगिरी कोणत्याही नेत्याला करता आली नाही.
- देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीने काँग्रेस, राष्ट्रवादीचे बालेकिल्ले उद्धवस्त करत भाजपचे वर्चस्व निर्माण झाले.
- राज्यात अडीच वर्ष सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीचे सरकार उलथवण्यात फडणवीसांची निर्णायक भूमिका होती. विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी आक्रमकतेने विरोधी पक्षाची भूमिका बजावली.
- फडणवीसांचा कार्यकर्त्यांशी सोशल ते ग्राउंडपर्यंत संपर्क आहे. त्यामुळेच भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या बद्दल आपुलकी आहे.
- लोकसभा निवडणुकीत भाजप, महायुतीचा मोठा पराभव झाला. त्यावेळी फडणवीसांनी समोर येत स्वत: पराभवाची जबाबदारी घेतली
- सगळ्या महत्त्वाचे म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पसंतीदेखील देवेंद्र फडणवीस यांना आहे.
advertisement
advertisement
advertisement
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांसारखे गुण तुमच्याकडे असतील तर आयुष्यात यशस्वी व्हाल
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 04, 2024 12:30 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra CM Devendra Fadnavis: 'ही' आहेत 10 कारणे, ज्यामुळे देवेंद्र फडणवीस झाले पुन्हा मुख्यमंत्री!
