TRENDING:

Solapur News : 'धैर्यशील मोहिते म्हणजे अकलूजचा वाल्मिक कराड, त्याने 16 जणांच्या...', कुर्डूच्या माजी सरपंचाचा आरोप

Last Updated:

Dhairysheel Mohite Patil : कुर्डू गावाची तुलना बीडच्या प्रकरणाशी करून गावाची बदनामी करणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ आज कुर्डू बंदची हाक देण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सोलापूर:  माढा तातुक्यातील कुर्डू गावकऱ्यांनी आज बंदची हाक दिली आहे. कुर्डू गावाची तुलना बीडच्या प्रकरणाशी करून गावाची बदनामी करणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ आज कुर्डू बंदची हाक देण्यात आली आहे. माढाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी कुर्डू गावाची तुलना बीडमधील बेकादेशीर कृत्यांशी केली होती. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अंजना कृष्णा यांच्या संवादाची व्हिडीओ क्लीप व्हायरल झाली होती. त्यानंतर मुरुम उत्खन कारवाईत अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी काहीजणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यावरून ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
न
advertisement

धैर्यशील मोहिते म्हणजे अकलूजचे  वाल्मिक कराड....

आज संपूर्ण गावात कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे. बेकायदा मुरूम उपसा प्रकरणी कुर्डू गावात कारवाईला आलेल्या महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना अजित पवारांनी व्हिडीओ कॉलवर धमकावलं होतं. यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी कुर्डूची परिस्थिती बीडपेक्षा भयानक असून गाव दहशतीत असल्याचं म्हटलं. मात्र आपल्या गावाला बीडची उपमा दिल्याने गावकरी एकत्र आले असून त्यांनी आज गाव बंदची हाक दिली आहे.

advertisement

या वेळी माजी सरपंच आण्णा ढाणे यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. धैर्यशील मोहिते पाटील अकलूजचा वाल्मिक कराड असल्याचे त्यांनी म्हटले. खासदार मोहिते यांनी 16 ते 17 खून करवून आणल्याचा गंभीर आरोप अण्णा ढाणे यांनी केला. आता या आरोपामुळे या सगळ्या प्रकरणाला राजकीय वळण लागण्याचे चित्र निर्माण झाले आहे.

advertisement

जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर प्रकरणाची दखल घेत घटनेचा अहवाल मागवला होता.जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी माढ्याचे तहसीलदार संजय भोसले यांना अहवाल देण्याचे आदेश दिले होते. तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना तीन पानी अहवाल पाठवला आहे. यात कुर्डूतील मुरूम उत्खनन बेकायदेशीर असल्याचा ठपका ठेवला आहे. ग्राम-महसुल अधिकाऱ्यांनी पंचनामा केल्यानुसार जमीन महसूल अधिनियमाच्या 1966 च्या कलम 48 (7),(8) नुसार ग्रामपंचायतला पाच लाख 47 हजार 200 रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Solapur News : 'धैर्यशील मोहिते म्हणजे अकलूजचा वाल्मिक कराड, त्याने 16 जणांच्या...', कुर्डूच्या माजी सरपंचाचा आरोप
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल