पत्रकार परिषदेत बोलताना राजाभाऊ फड यांनी तपासातील त्रुटींवर बोट ठेवले. महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सुरू असताना धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून पोलिसांना फोन आले आणि त्यामुळेच संपूर्ण तपास प्रक्रिया थांबवण्यात आली होती, असा थेट आरोप फड यांनी केला. जर महादेव मुंडे प्रकरणाचा तपास त्याच वेळी योग्य पद्धतीने झाला असता, तर पुढील काळात बापू आंधळे आणि संतोष देशमुख यांसारख्या हत्या झाल्या नसत्या, असेही ते म्हणाले.
advertisement
नार्को टेस्टचा अहवाल जाहीर करा
या प्रकरणात अनेक संशयितांच्या 'ब्रेन मॅपिंग' आणि 'नार्को टेस्ट' करण्यात आल्या आहेत. या चाचण्यांमध्ये जे काही सत्य समोर आले आहे, ते पोलिसांनी तातडीने जाहीर करावे, अशी मागणी फड यांनी केली आहे. धनंजय मुंडे हे सत्तेचा वापर करून आजवर अनेक खून प्रकरणांचा तपास दडपत आले आहेत, असा आरोप करत त्यांनी संपवलेल्या 10 लोकांची नावे आपल्याकडे उपलब्ध असल्याचेही फड यांनी स्पष्ट केले.
20 मार्चचा अल्टिमेटम
महादेव मुंडे यांच्या हत्येला प्रदीर्घ काळ लोटूनही मूळ सूत्रधारांना अटक झालेली नाही. या पार्श्वभूमीवर राजाभाऊ फड यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर 20 मार्चपर्यंत या प्रकरणातील खऱ्या आरोपींना अटक झाली नाही आणि पारदर्शक कारवाई झाली नाही, तर शरद पवार गटाच्या वतीने पुन्हा एकदा तीव्र आंदोलन छेडले जाईल.
हे ही वाचा :
