धाराशिव : राज्यातील सरकारी शाळांची अवस्था ही दिवसेंदिवस खराब आहे. त्यामुळे पालकांचा ओढा हा खासगी शाळांकडे आहे. यातच काही सरकारी शाळा अशा आहेत, ज्या आपला दर्जा आजही टिकवून आहेत. पण त्याठिकाणी पुरेसा शिक्षकवर्ग नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. आज अशाच एका तब्बल 100 वर्षे जुन्या असलेल्या शाळांबाबत आपण आज जाणून घेणार आहोत.
advertisement
ही शाळा धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात आहे. सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेली आणि 100 वर्ष जुनी असलेली ही शाळा आहे. जिल्हा परिषद शाळा इट येथील या शाळेबाबत सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या शाळेच्या मुख्याध्यापकाचे पद हे 1992 पासून रिक्त आहे.
शाळेची गुणवत्ता शाळेच्या बोलक्या भिंती, भिंतीवर रेखाटलेले बहुविध ज्ञान, विस्तीर्ण मैदान आणि प्रशस्त वर्ग खोल्या, वर्ग खोल्यांच्या भिंतीवरील महापुरुषांचे विचार विद्यार्थ्यांना प्रेरणा देत आहेत. याठिकाणी पहिली ते दहावीपर्यंतच्या वर्गात एकूण 1150 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
पालकांनी केली ही मागणी -
रिक्त शिक्षकांची पदे तत्काळ भरावी, यासाठी 2 वर्षांपूर्वी ही शाळा बंद करण्यात आली होती. या शाळेत शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, अशी खंत पालक संदिपान कोकाटे यांनी व्यक्त केली. म्हणून आता तत्काळ शिक्षक देण्यात यावेत आणि विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे, अशी मागणी सर्वच पालकांमधून करण्यात येत आहे.
इयत्ता 9 वी ते 10 वीच्या 275 विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी केवळ तीनच शिक्षक आहेत. त्यातील एका शिक्षकाकडे प्रभारी मुख्याध्यापक पदाचा पदभार आहे. तसेच आणखी धक्कादायक बाब म्हणजे गणित, विज्ञान व समाजशास्त्र या विषयासाठी शिक्षकच नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
प्रसुतिनंतर नातेवाईक पहिला प्रश्न कोणता विचारतात? महिला डॉक्टरने सांगितलं भयानक वास्तव
एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद होत आहेत. तर दुसरीकडे विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात असूनही शिक्षकांच्या रिक्त पदांच्या भरतीबाबत शिक्षण विभाग डोळेझाक करीत असल्याची खंत पालक संदिपान कोकाटे यांनी व्यक्त केली आहे.
शिक्षकांच्या बदलीनंतर याठिकाणी शिक्षक देणे शासनाच्या नियमानुसार बंधनकारक आहे. मात्र, या ठिकाणी शिक्षक देण्यात आले नाहीत. या ठिकाणी शिक्षकांची पदे रिक्त असताना 3 महत्त्वाच्या विषयाच्या शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात पट संखे मागे संच मान्यताही असते. पण संच मान्यताही करण्यात आलेली नाही. त्यामुळे संच मान्यता करण्यात यावी, अशी मागणी पालक करीत आहेत.