धाराशिव : कांदा पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे रोगांची लक्षणे ओळखून तत्काळ उपायोजना करायला हव्यात, अन्यथा नुकसान होऊ शकते. ढगाळ वातावरणामुळे यावर्षी खरिपातील कांदा पिकावर मोठ्या प्रमाणात बुरशीजन्य रोगांचा व कीड रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तर विशेष करून कांदा पिकावर हवेमार्फत व जमिनीतून विविध रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्याच्या नियंत्रणासाठी एकात्मिक किड रोग नियंत्रण प्रभावी ठरते आहे.
advertisement
सध्या कांदा पिकावर किंवा पिकाच्या रोपावरती बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी पूर्वतयारी करणे गरजेचे आहे.
उन्हाळ्यात खोल नांगरट करावी. एका शेतामध्ये तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी कांद्याचे पीक घेऊ नये. कांद्याची रोपे तयार करताना ती गादी वाफ्यावर तयार करावीत.
पहिल्यांदाच पाहता येणार महाराणी येसुबाईंची नाममुद्रा, साताऱ्यात होतेय गर्दी, जाणून घ्या इतिहास
विशेष करून सरीवरंब्यावर कांद्याचे पीक घेतल्यास रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. कांद्याची पेरणी करण्यापूर्वी किंवा रोप टाकण्यापूर्वी कांदा बीज प्रक्रियेत 1.5 ग्रॅम अंतर प्रवाही आणि 1.5 ग्रॅम स्पर्शजन्य बुरशीनाशक प्रति किलो बियाण्यास लावावे किंवा आठ ते दहा ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति किलो बियाण्याची लागवड करावी, असा सल्ला सहाय्यक प्राध्यापक डॉ. राघवेंद्र पाटील यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
अनेक तास बसून काम, पाठदुखीचा झाला त्रास, या सोप्या टिप्स ठरतील फायदेशीर, ऑफिसमध्ये करू शकता ट्राय
कांदा पिकावरती बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून आल्यास होणारे अधिकचे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाचा सल्ला शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.