धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील ईट येथील बिराजी देशमुख यांनी ईट येथे पान टपरी सुरू केली. यावेळी लोक पॅक केलेले दूध खरेदी करत आहेत, असे त्यांनी बारकाईने पाहिले. त्यावर त्यांनी स्वतःचा दुधाचा व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी दोन गायी खरेदी केल्या आणि दुध व्यवसायाला सुरुवात केली.
आज दिवसाकाठी बिराजी देशमुख यांचे 1100 ते 1200 लिटर दुध संकलन होते. त्यातून काही दुध खरेदी करुन लोकांना विक्री करतात. त्यातून त्यांना दिवसाला 500 ते 600 रूपये नफा मिळतो. तर दुध कमीशनमधुन 1200 रुपये असे त्यांना 1600 रुपये दर दिवशी मिळतात. या माध्यमातून ते महिन्याला 48 हजार रुपये अशाप्रमाणे वर्षाला पावणेसहा लाख रुपयांची उलाढाल करत आहेत.
advertisement
एकेकाळी रोजगार प्राप्त करण्यासाठी बिराजी देशमुख यांनी रोजंदारीने काम केले. इतकेच नाही तर पुण्याला जाऊन काम केले त्यानंतर गावाकडे येऊन पान टपरीचा व्यवसाय सुरू केला. दोन गायी विकत घेतल्या आणि व्यवसाय सुरू केला. त्यानंतर दूध विक्रीचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. आता दूध विक्रीच्या व्यवसायातून त्यांना महिन्याकाठी 48 ते 50 हजार रुपयांचे उत्पन्न मिळते आहे, असे बिराजी देशमुख यांनी सांगितले.
'गावाचं आपण देणं लागतो', याच विचारातून डॉक्टर तरुणाने घेतला कौतुकास्पद निर्णय, धाराशिवमधील कहाणी
अनेक लोक त्यांच्या दूध संकलन केंद्रावरून दूध घेऊन जातात. त्यामध्ये म्हशीचे आणि गायीचे दूध आहे. फक्त कमिशन वजा करता ते स्वस्तात लोकांना दूध विक्री करतात. त्यामुळे दूध खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी असते. त्यांचा हा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे.