TRENDING:

गरीबाच्या पोरानं नाव कमावलं! प्रतिष्ठित विद्यापीठात मिळवली 14 लाखांची फेलोशिप, अत्यंत प्रेरणादायी कहाणी

Last Updated:

अशोका विद्यापीठ दरवर्षी 100 जिज्ञासू तरुण आणि प्रेरित व्यक्तींची निवड करते आणि त्यांना बहुविद्याशाखीय बहुआयामी शिक्षण देते. यामध्ये मराठवाड्यातील या तरुणाची निवड झाली आहे. कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर समाधान गलांडे या तरुणाने दिल्लीच्या अशोका विद्यापीठाची 14 लाख रुपयांची फेलोशिप मिळवली आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
उदय साबळे, प्रतिनिधी
advertisement

धाराशिव : परिस्थिती कितीही कठोर आली तरी संघर्ष करत सकारात्मक राहत प्रत्येक संकटाला तोंड देत काही जण सर्वांसमोर प्रेरणादायी उदाहरण सादर करतात. आज अशाच एका तरुणाची कहाणी आपण जाणून घेणार आहोत, ज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असताना त्याने मेहनत करत जिद्दीने अभ्यास केला आणि तब्बल 14 लाख रुपयांची फेलोशिप मिळवली आहे.

advertisement

कोण आहे हा तरुण -

अशोका विद्यापीठ दरवर्षी 100 जिज्ञासू तरुण आणि प्रेरित व्यक्तींची निवड करते आणि त्यांना बहुविद्याशाखीय बहुआयामी शिक्षण देते. यामध्ये मराठवाड्यातील या तरुणाची निवड झाली आहे. कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर समाधान गलांडे या तरुणाने दिल्लीच्या अशोका विद्यापीठाची 14 लाख रुपयांची फेलोशिप मिळवली आहे.

समाधान हा महाराष्ट्रातील दुष्काळी मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील सुकटा येथील रहिवासी आहे. त्याचे वडील रोजंदारीचे कामाला जायचे. तो अल्पभूधारक कुटुंबातून येत असल्याने शेतीवर अवलंबून न राहता त्याच्या आईला रोजंदारीने कामाला जावे लागते. समाधान दहावीत असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्या दरम्यान, त्याची बोर्डाची परीक्षा केवळ दोन महिन्यांवर राहिली होती. मात्र, या कठीण काळात डगमगून न जाता अभ्यास केला आणि समाधानला 81 टक्के गुण मिळाले.

advertisement

आई करायची धुणीभांडी, तर वडील होते कॅन्टीनमध्ये; पण मुलानं करुन दाखवलं, चेंबूरमधील हॉटेलची सर्वत्र चर्चा

घरावर दुःखाचा डोंगर कोसळलेला त्यात घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. अशा परिस्थितीत समाधानने बार्शीला महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश घेतला. त्यासाठी त्याला त्याची आई रोजंदारीने काम करून महिन्याकाठी दीड ते 2 हजार रुपये पाठवायची. त्यात अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत बार्शी येथे शिक्षण पूर्ण केले.

advertisement

तंबाखू व्यसनमुक्तीची चळवळ राबविणारा 'रामचंद्र', हजारो लोकांचं केलं समुपदेशन, सोलापुरातील व्यक्तीचं प्रेरणादायी कार्य

समाधानची आई महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेतून कामाला जायची. घरच्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमुळे समाधानला शिक्षण घेणं शक्य होत नव्हते. त्यानंतर पुढे त्याने पुणे येथून पदवीचे पूर्ण केले आणि पोस्ट ग्रॅज्युएशनला गोखले इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. त्यावेळी समाधानच्या मित्रांनी त्याला फीसाठी मदत केली.

advertisement

अशोका विद्यापीठाच्या एका वर्षाच्या फेलोशिप प्रोग्रामसाठी समाधानने अर्ज केला होता. या प्रक्रियेमध्ये त्याने केलेल्या कष्ट, जिद्द आणि संघर्षाचे फळ मिळाले. समाधानची अशोका विद्यापीठाच्या फेलोशिपसाठी निवड झाली आहे. आजही 250 रुपये रोजाने कामाला जाणाऱ्या समाधानच्या आईच्या चेहऱ्यावर हास्य पाहायला मिळालं. आजही समाधानच्या आई या रोजंदारीने कामाला जातात. तर समाधान आता दिल्लीत शिक्षण घेत आहे. उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी तो अत्यंत मेहनत घेत आहे. त्याचा हा प्रवास ग्रामीण भागातील तरुणासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
गरीबाच्या पोरानं नाव कमावलं! प्रतिष्ठित विद्यापीठात मिळवली 14 लाखांची फेलोशिप, अत्यंत प्रेरणादायी कहाणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल