TRENDING:

Maratha reservation : 'काही अडचण आली तर..' मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या कुटुंबाचं पालकत्व तानाजी सावंतांनी घेतलं

Last Updated:

Maratha reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आत्महत्या केलेल्या शहाजी कदम यांच्या कुटुंबाचे पालकत्व पालकमंत्री तानाजी सावंत यांनी घेतलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
धाराशिव, 11 सप्टेंबर (बालाजी निरफळ, प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांना राज्यभर पाठिंबा मिळत आहे. धाराशिव जिल्ह्यातील तरुणाने आरक्षणाच्या मागणीसाठी आपलं जीवन संपवलं. आरोग्य मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी येरमाळा येथील मयत शहाजी कदम यांच्या घरी भेट दिली. यावेळी या कुटुंबाला आधार देत त्यांचे पालकत्व स्वीकारले.
पालकमंत्री तानाजी सावंत
पालकमंत्री तानाजी सावंत
advertisement

अडणच आली तर संपर्क करा : सावंत

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी शहाजी कदम हे उपोषणाला बसले होते. उपोषणाला बसले असताना त्यांनी आत्महत्या केली होती. त्या कुटुंबाची आज पालकमंत्री सावंत यांनी येरमाळा गावात जाऊन भेट घेत सांत्वन केले. मंत्री सावंत यांनी मृत कदम यांच्या तीन मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेत पालकत्व स्वीकारले. कुटुंबाला कुठली अडचण आली तर काका संपर्क करा, असेही या भेटीदरम्यान आश्वासन दिले आहे. दरम्यान आंदोलन करणाऱ्या तरुणांनी आत्महत्याचे विचार डोक्यात देखील आणू नका. सरकार तुमच्या पाठीशी असल्याचे आवाहन देखील सावंत यांनी केले आहे.

advertisement

उपोषण मागे घेण्यासाठी सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांना पत्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (बुधवारी 6 सप्टेंबर) निर्देश दिल्याप्रमाणे मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा - कुणबी, कुणबी - मराठा जात प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींची समिती नेमण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला. याशिवाय मनोज जरांगे पाटील यांना आपले उपोषण मागे घेण्याची विनंती करणारे सचिव सुमंत भांगे यांचे पत्रही देण्यात आले.

advertisement

वाचा - मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय नेत्यांची मॅरेथॉन चर्चा, सह्याद्रीवर खलबतं

जरांगे पाटील उपोषणावर ठाम

सरकारने काल घेतलेल्या निर्णयाचा आम्हाला काहीच फायदा होत नाही. त्यामुळे वंशवंळी नोंदी असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय मागे घेऊन, सरसकट मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात यावा. तसेच, आमच्याकडे पुरावे असल्याचं आम्ही आधीच सांगितले आहेत. त्यामुळे सरसकट प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात यावा. आदेश काढण्यासाठी आमच्याकडे पुरावे आहेत. सरकरच्या शिष्टमंडळाने यावं चर्चा करावी आम्ही त्यांना पुरावे देण्यासाठी तयार असल्याचं जरांगे म्हणाले आहेत. तसेच हे आंदोलन असेच सुरू असणार असल्याचं देखील ते म्हणाले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
Maratha reservation : 'काही अडचण आली तर..' मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या कुटुंबाचं पालकत्व तानाजी सावंतांनी घेतलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल