Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय नेत्यांची मॅरेथॉन चर्चा, सह्याद्रीवर खलबतं

Last Updated:

मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर गेल्या दीड तासांपासून सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सुरू आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक
मुंबई, 11 सप्टेंबर : मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर गेल्या दीड तासांपासून सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत सरकार जे प्रयत्न करतायत त्याची माहिती सर्वपक्षीय नेत्यांना देण्यात आली आहे. दरम्यान बैठकीसाठी आलेल्या संभाजीराजे छत्रपतींनी आरक्षणाविषयी रोखठोक भूमिका मांडली. मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय बैठक घेण्याचं सरकारला उशीरा शहाणपण सुचल्याची टीका त्यांनी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, छगन भुजबळ, गिरीश महाजन, दादा भुसे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, छत्रपती संभाजीराजे भोसले, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल परब, राजेश टोपे, चंद्रशेखर बावनकुळे, राजू पाटील, विनोद निकोले, सदाभाऊ खोत, राजेंद्र गवई, सुनील तटकरे, गौतम सोनवणे उपस्थित आहेत.
advertisement
या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत सरकार जे प्रयत्न करत आहे, त्याची माहिती सर्वपक्षीय नेत्यांना देण्यात येत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडावे यासाठी प्रयत्नही केले जाणार आहेत.
जालन्याच्या अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंनी आता आमरण उपोषण सुरु केलं आहे. मराठा आरक्षणाची मागणी करत, मागील 14 दिवसांपासून जरांगे उपोषणाला बसले आहे.. मागील दोन दिवसांपासून तर जरांगेंनी पाणी आणि उपचारही थांबवला. जरांगेंच्या या भूमिकेमुळे सरकारची चिंता वाढली आहे. पण, जरांगेंनी प्रतिष्ठा पणाला लावू नये, असं म्हणत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी जरांगेंना थांबण्याचं आवाहन केलं.
advertisement
मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देणार असाल तर मग पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांवर अन्याय का असा सवाल काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय. सरकार निजाम कालीन कागदपत्रं, पुरावे दाखले ग्राह्य धरतेय पण शाहू महाराजांचे दाखले सरकार ग्राह्य का धरत नाही, हा कोणता न्याय आहे? असा प्रश्नही पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारला.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय नेत्यांची मॅरेथॉन चर्चा, सह्याद्रीवर खलबतं
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement