TRENDING:

मधुमेहाच्या रुग्णांसाठी महत्त्वाची बातमी!, काय खावं, काय खाऊ नये?, पावसाळ्यात घ्या अशी काळजी

Last Updated:

पावसाळ्यात अनेक साथीचे रोग पसरतात. त्यातच पावसाळा हा मधुमेहाच्या रुग्णांसाठी महत्त्वाचा असतो. याच पावसाळ्यात मधुमेहाच्या रुग्णांनी नेमकी कोणती काळजी घ्यावी, यावर एमडी फिजिशियन डॉ. विक्रांत शिंदे यांनी याबाबत आरोग्यविषयक सल्ला दिला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
उदय साबळे, प्रतिनिधी
advertisement

धाराशिव : पावसाळ्यात विविध आजारांचा धोका असतो. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनाही मोठा धोका असतो. म्हणून अशा परिस्थितीत पावसाळ्यात मधुमेहाच्या रुग्णांनी नेमकी कोणती काळजी घ्यावी, हे आपण जाणून घेऊयात.

पावसाळ्यात अनेक साथीचे रोग पसरतात. त्यातच पावसाळा हा मधुमेहाच्या रुग्णांसाठी महत्त्वाचा असतो. याच पावसाळ्यात मधुमेहाच्या रुग्णांनी नेमकी कोणती काळजी घ्यावी, यावर एमडी फिजिशियन डॉ. विक्रांत शिंदे यांनी याबाबत आरोग्यविषयक सल्ला दिला.

advertisement

डिमेन्शिया हा खूपच भयंकर आजार; दही खाल्ल्याने अन् कोडी सोडवल्यानं बरा होतो का?, डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची माहिती

लोकल18 बोलताना त्यांनी सांगितले की, मधुमेहाच्या रुग्णांनी पावसाळ्यात विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यात मधुमेहाच्या रुग्णाने बाहेरचे अन्न अजिबात खाऊ नये. संसर्गाची भीती असते. घरात बनवलेले शुद्ध आणि स्वच्छ अन्न खावे. अशा हवामानात आपण कमी शिजवलेले अन्नदेखील टाळले पाहिजे. त्यामुळे संसर्ग टळेल.

advertisement

जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर पावसात भिजणे टाळावे. जर तुम्ही पावसात भिजत असाल तर लगेच कोरडे कपडे आणि शूज घाला. मधुमेह असेल तर पाय नेहमी स्वच्छ आणि कोरडे ठेवण्याचा प्रयत्न करावा. यामुळे तुम्ही इन्फेक्शनपासून दूर राहाल.

घरात फळे आणि भाज्या आणताना पाण्याने धुवून घ्याव्यात. त्यानंतर त्यांचा चांगला वापर करा. हे करणे सामान्य लोकांपासून ते मधुमेहाच्या रुग्णांसाठीही खूप महत्वाचे आहे.

advertisement

हिंदू पंचांग नेमके कसे पाहतात, हे कुणी तयार केलं?, जाणून घ्या, याचे वैज्ञानिक आणि धार्मिक महत्त्व..

काही भाज्या गरम पाण्यात उकळल्याशिवाय खाऊ नका. पावसाळ्यात मधुमेह रुग्णांनी जीवनसत्त्वयुक्त पदार्थ आणि पेयांचे सेवन करावे. यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढेल, असा आरोग्यविषयक सल्ला डॉ. विक्रांत शिंदे यांनी मधुमेहाच्या रुग्णांसाठी दिला.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
मधुमेहाच्या रुग्णांसाठी महत्त्वाची बातमी!, काय खावं, काय खाऊ नये?, पावसाळ्यात घ्या अशी काळजी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल