गेल्या काही महिन्यांपासून फारूक शेख पक्षात नाराज होते. मतदारसंघातील कामांसाठी सत्ताधारी पक्षात प्रवेश करावा, असे त्यांचे कार्यकर्ते त्यांना सांगत होते. अखेर मंगळवारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांनी प्रवेश केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, तसेच मंत्री हसन मुश्रीफ यांची पक्षप्रवेशाला उपस्थिती होती.
डॉ. फारुक शाह यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाने धुळ्यात एमआयएमला मोठा धक्का बसणार आहे. डॉ. शाह यांच्या रुपात धुळे शहरात राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी शाह यांनी प्रवेश केल्याने धुळ्यात राष्ट्रवादीला मोठा फायदा होईल, असे राजकीय जाणकार सांगतात.
advertisement
धुळे शहर विधानसभा मतदार संघातून फारुक शहा 2019 ला विजयी झाले होते. त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष धुळे शहर विधानसभेच्या निकालाने वेधून घेतले होते. धुळे शहरात अल्पसंख्यांक भागात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आता वाढली असून, धुळ्यात भाजपाच्या हिंदुत्वाच्या राजकारणाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शहा यांच्या प्रवेशामुळे युतीत राहून भाजपाला शह दिल्याचे बोलले जाते. या पक्षप्रवेशाचा महानगरपालिका निवडणुकीतही परिणाम दिसून येणार आहे.
कोण आहेत डॉ. फारूख शाह?
एमआयएम पक्षाचे धुळे शहराचे नेते डॉ. फारूख शेख
डॉ. फारूख शेख हे एमआयएम पक्षाचे आमदारही होते
धुळे शहरात त्यांचे कार्यकर्त्यांचे जाळे आहे, मोठे संघटन आहे