धुळे जिल्ह्यात महाराष्ट्रात पहिला मंकी पॉक्सचा रूग्ण सापडल्याची घटना समोर आली आहे. एका 44 वर्षीय व्यक्तीला मंकी पॉक्सची लागण झाली आहे. या रूग्णावर धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आलेल्या तपासणीत मंकीपॉक्सची लागण झाल्याचं स्पष्ट झाले होते. त्यामुळे धुळ्यात एकच खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सौदी अरेबियातून 44 वर्षीय व्यक्ती धुळ्यात आला होता.या व्यक्तीला त्वचे संदर्भात त्रास होत होता. त्यामुळे तो उपचारासाठी भाऊसाहेब हिरे रुग्णालयात दाखल झाला होता.यावेळी रुग्णालयात घेण्यात आलेल्या रक्त तपासणीत त्या रुग्णाला मंकी पॉक्सची लागण झाल्याचं स्पष्ट झाले होते.त्यामुळे राज्यातील पहिला मंकी पॉक्स रुग्ण धुळ्यात आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ माजली आहे.
advertisement
44 वर्षीय हा रूग्ण आहे.नोकरीनिमित्त तो सौदी अरेबियाला असतो. पण आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी तो 2 ऑक्टोबरला भारतात आला.त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला त्रास झाल्याने तो ओपीडीत आला होता. यावेळी त्याच्यात मंकी पॉक्सची लक्षणे आढळून आल्याने त्याला आपण अॅडमीट करू घेतलं होतं. आणि महानगरपालिकेला देखील याबाबतची माहिती दिली होती,असे भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सयाजी भामरे यांनी सांगितले.
माइक्रोबायोलॉजी आणि स्किन डिपार्टमेंटने त्यांचे सॅम्पल घेऊन नियमाप्रमाणे नॅशनल इंस्टिटयूट ऑफ व्हायरलॉजी पुणे येथे महापालिकेतर्फे पाठवण्यात आले होते. यावेळी त्याचा पहिला रिपोर्ट 7 ऑक्टोबरला पॉझिटीव्ह आला होता.त्यामुळेच आम्ही त्याला 3 तारखेपासून संशयित रुग्ण म्हणून अलगीकरण केले होते,अशी माहिती डॉ. सयाजी भामरे यांनी दिली.
त्यानंतर रुग्णाचा दुसरा रिपोर्ट 8 तारखेला देखील पॉझिटीव्ह आला होता.त्यामुळे त्याला अॅडमीटच ठेवले होते.तसेच आज 13 तारखेला तिसरा सॅम्पल आपण तपासणीसाठी पाठवला आहे. हा रिपोर्ट जर निगेटीव्ह आला तर त्याला डिस्चार्ज दिले जाईल,अशी माहिती सयाजी भामरे यांनी दिली आहे.
संशयित रुग्ण फॅमिली फक्शनसाठी धुळ्यात आली होती. त्यामुळे धुळ्यात आल्यानंतर त्यांचा कुणाकुणाशी संपर्क झाला होता, याची चौकशी करण्यात आली होती. यामध्ये त्यांचा मुलगा, पत्नी यांचे देखील नमुने आपण तपासणीसाठे पाठवले होते. पण हे नमुने निगेटीव्ह आले आहेत, तरी देखील त्यांना आम्ही अंडर ऑब्सर्वेशन ठेवणार आहोत. या दरम्यान काही लक्षणे आढळल्यास त्याची पुन्हा तपासणी केली जाईल, असे डॉ. सयाजी भामरे यांनी सांगितले.
मंकी पॉक्सचे दोन प्रकार आढळतात.क्लेड I आणि क्लेड II. हा जो रूग्ण आढळला आहे तो क्लेड I टाईपचा आहे. भारतामध्ये आतापर्यंत फक्त 35 रुग्ण आढळून आली आहेत. आणि महाराष्ट्रात हा पहिला क्लेड I वेरीयंट आहे.क्लेड 1 हा जास्त इन्फेक्टीव आणि व्हिरोलंट असतो.आणि त्याचा रिकव्हरी टाईम देखील जास्त असतो त्यामुळे रुग्ण बरा व्हायला जास्त वेळ घेतो