धुळे : महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या धुळे जिल्ह्यातील आंबागाव शिवारात पोलिसांनी छापा टाकत गांजाची शेती उद्ध्वस्त केली आहे. यावेळी शिरपूर ग्रामीण पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई करत सुमारे सव्वा दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शिरपूर तालुक्यातील आंबागाव शिवारातील वन जमिनीवर अवैधरित्या गांजाची शेती केली जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाली होती.
advertisement
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या आंबागाव शिवारातील एका शेतात मका व दादर पिकाच्या आड ठिबक सिंचनचा वापर करून मोठ्या प्रमाणात गांजाची शेती केली जात होती. यावेळी पोलिसांनी सुमारे तीन एकर क्षेत्रात कारवाई करत सुमारे 11 हजार किलो गांजा जप्त केला आहे. शिरपूर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर मध्यप्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या भागात अवैधरित्या गांजाची लागवड केली जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. याप्रकरणी शिरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
देशात गांजावर पूर्णपणे बंदी
देशात गांजावर पूर्णपणे बंदी आहे. तरीही लोक छुप्या पद्धतीने याची लागवड करतात. काहीजण व्यापार देखील करतात. त्याचे सेवन करतात. अशाप्रकारे, आपल्या देशात हजारो वर्षांपासून गांज्याचं सेवन केलं जातं. गेल्या अनेक वर्षांपासून देशात गांजावरील बंदी हटविण्याची मागणी होत आहे. काही वेळेला तर शेतकऱ्यांनी गांज्याची लागवड करण्याची सरकारनं परवानगी द्यावी अशी देखील मागणी केली आहे. तर अनेकदा शेतकरी नेत्यांनी देखील शेतकऱ्यांना गांजा लागवडीसाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.
पोलिसांची करडी नजर
शेतकरी गुन्हे लपवण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवत असतात. त्यात अनेक गुन्हेगार यशस्वी होतात तर काही गुन्हेगारांचा गुन्हा फसतो. लागवडीबरोबरच सध्या राज्यात गांजाच्या तस्करीचं प्रमाण वाढत आहे. मात्र या गुन्ह्यात सापडू नये, म्हणून या आरोपी रोज नवी शक्कल लढवत आहे. मात्र पोलिस त्यांचा प्लॅन चांगलाच हाणून पाडत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि गांजाची तस्करी होत असल्याचं मागील काही दिवसांपासून समोर आलं आहे पोलीस, रेल्वे पोलीस आणि कस्टम या विभागांची यांची तस्करांवर करडी नजर असल्याचं कारवायांमधून दिसून येत आहे.