धुळे, 18 ऑगस्ट : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या तसेच बलात्काराच्याही घटना राज्यात वाढल्या आहेत. तसेच आर्थिक फसवणूक आणि मानसिक तणावातून आत्महत्येच्याही घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
सिव्हील इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण झालेल्या 24 वर्षीय तरुणीने तापी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नंदिनी रवींद्र खैरणार असे या तरुणीचे नाव आहे. धुळे शहरातील साई दर्शन कॉलनीत राहणाऱ्या नंदिनी रवींद्र खैरणार हिने सावळज जवळील तापी नदीच्या पुलावरून आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवली आहे.
advertisement
नंदिनी हिचे सिव्हील इंजिनिअरिंगचे शिक्षण झाले. ती नाशिक येथे पुढील शिक्षण घेत होती. दोन दिवसांपूर्वीच ती नाशिक येथून धुळे येथे घरी आली होती. दरम्यान, सकाळी मैत्रिणीकडे जाऊन येते, असे सांगून नंदिनी घराबाहेर निघाली. मात्र, ती परत परतली नाही. यानंतर तिचा शोध सुरू असताना ती कुठेही सापडली नाही.
दरम्यान, सावळदेच्या तापी नदीच्या पुलावरून एका तरुणीने नदीत उडीकून आत्महत्या केल्याची घटना कळताच शिरपूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यानतंर पोलिसांनी स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने तरुणीचा मृतदेह शोधून बाहेर काढण्यात आला. दरम्यान, नंदिनीने आत्महत्या का केली याचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.