धुळे लोकसभा मतदार संघात बाहेरील व्यक्तीला उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाने मला उमेदवारी नाकारून माझ्यावर अन्याय केला, असा आरोप शामकांत सनेर यांनी केला आहे. दरम्यान दोन दिवसांत पक्षाने उमेदवार न बदलल्यास तीव्र भूमिका घेण्याचा इशारा देखील सनेर यांनी दिला आहे. काँग्रेस पक्षाबाबत येत्या दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
advertisement
दरम्यान सनेर यांनी बच्छाव यांना उमेदवारी जाहीर होताच जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. दोन दिवसांत पक्षाने उमेदवार न बदलल्यास तीव्र भूमिका घेऊ असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे आता धुळ्यात काँग्रेसच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीवर सनेर यांच्यासोबतच स्थानिक कार्यकर्त्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता काँग्रेस नेतृत्व धुळ्याच्या जागेबाबत काय निर्णय घेणार? याकेड राज्याचं लक्ष लागलं आहे.