धुळे : नाशिकमध्ये एकाच कुटुंबातल्या तिघांनी आत्महत्या केल्याची घटना बुधवारी समोर आली होती. चिमुकल्या मुलीला विष पाजून त्यानंतर पती पत्नीने गळफास घेतला होता. आता धुळ्यात एकाच कुटुंबातल्या चौघांनी जीवन संपवल्याची माहिती समोर आली. एकाच कुटुंबातल्या चौघांच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. प्रमोद नगर भागातल्या समर्थ कॉलनीत ही घटना उघडकीस आलीय.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, प्रवीण मानसिंग गिरासो हे त्यांच्या कुटुंबासह प्रमोद नगर भागात समर्थ कॉलनीत राहत होते. प्रवीण यांनी पत्नी दीपा, मुलगा मितेश आणि सोहम यांच्यासह आत्महत्या केली. प्रवीण यांचं वय 48, तर पत्नी दीपा या 44 वर्षांच्या होत्या. मुलगा मितेश 18 तर सोहम 13 वर्षांचा होता.
advertisement
चौघांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. यात प्रवीण गिरासे यांनी गळफास घेतल्याची तर इतरांनी विषारी औषध प्राशन केल्याची माहिती समजते. हा प्रकार उघडकीस येताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. कुटुंबाने इतका टोकाचा निर्णय का घेतला याचा शोध आता पोलीस घेत आहेत. आत्महत्या प्रकरणी पोलिसात नोंद झाली असून अधिक तपास करत आहेत.