धुळे शहराला लागून असलेल्या चित्तोड गावात एकलव्य मित्र मंडळाची विसर्जन मिरवणूक सुरू असताना एका ठिकाणी थांबून कार्यकर्ते नाचत होते. मद्यधुंद चालकाने ट्रॅक्टर अचानक सुरू केल्याने ट्रॅक्टर खाली येऊन तीन लहान बालकांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी आहेत. जखमींना तातडीने शहरातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
गणपती विसर्जन मिरवणुकीचा सगळीकडे उत्साह असताना धुळ्यातील घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून ट्रॅक्टर चालक हा दारू प्यायलेल्या अवस्थेत असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घडलेल्या घटनेचा तपास धुळे तालुका पोलीस करत आहेत.
advertisement
मृतांमध्ये परी शांताराम बागुल (वय १३), शेरा बापू सोनवणे (वय ६) लड्डू पावरा (वय ३) या बालकांचा समावेश आहे. घटनेनंतर चिमुरड्यांच्या कुटुंबियांनी काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश केला. दुसरीकडे घटनेत गंभीर जखमी असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी हिरे रुग्णालयात प्रचंड गर्दी केली होती.