घटनेबाबत अधिक माहिती अशी की काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाला पाटील यांच्या सहकारी सूतगिरणीवर आयकर विभागानं छापा टाकला आहे. गेल्या 24 तासांपासून ही चौकशी सुरू आहे. ही पथक नागपूर आणि पुणे येथील असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र अद्याप या वृत्ताला दुजोरा मिळू शकलेला नाहीये.
दरम्यान काल रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. आयकर विभागाचं पथक सूतगिरणीतच थांबलेलं आहे. त्यामुळे आज सलग दुसऱ्या दिवशीही चौकशीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मोराणे येथील जवाहर सहकारी सूतगिरणीवर हा छापा टाकण्यात आला आहे. तपासाबाबत आयकर विभागाकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. आमदार कुणाल पाटील यांच्या सूतगिरणीवर धाड टाकण्यात आल्यानं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
advertisement
Location :
Dhule,Dhule,Maharashtra
First Published :
October 01, 2023 11:05 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धुळे/
मोठी बातमी! काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या सूतगिरणीवर आयकर विभागाचा छापा