जयंत पाटलांची अजितदादांना कोपरखळी
रिक्षा गुलाबी, जॅकेट गुलाबी फुल मात्र पांढरं असं म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांना कोपरखळी मारली आहे. सध्या राज्यात सगळ्या गुलाबी गोष्टी होत आहेत, रंगाला माझं काही ऑब्जेक्शन नाही, कुठला रंग वापरावा हे ज्याचं त्याचं चॉईस आहे. पण फुल मात्र पांढरे वापरले असं सांगत राष्ट्रवादी शरद पवार गटांचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पिंक जॅकेटवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला.
advertisement
वाचा - अंतरवालीत उपोषणाला बसलेल्या जरांगेंची नवी खेळी? आंदोलनाचं ठिकाण बदलण्याचा इशारा
आमच्या काळातही या योजना सुरू ठेऊ पण.. : जयंत पाटील
भाजप विविध योजनांची घोषणा सध्या करत आहे. मात्र, लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेत आपला पराभव अटळ आहे, हे लक्षात आल्याने भाजपाला या गोष्टी आठवल्या अशी टीका जयंत पाटील यांनी भाजपवर केली आहे. बहिण भावा नंतर आता आजोबा पुतणे चुलते हे देखील येणाऱ्या काळात लाडके होण्याची शक्यता आहे, असं सांगत जयंत पाटील यांनी लाडका भाऊ व लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका केली आहे. तिजोरीत काही असो की नसो विविध योजनांची घोषणा करण्याचं राज्य सरकारने ठरवलं आहे. आमचं सरकार पडलं तर या योजना बंद होतील असं सांगणं चुकीचं आहे. या योजनांमधील त्रुटी दूर करून अधिक चांगल्या पद्धतीने आम्ही आमचं सरकार आल्यानंतर या योजना राबवू व लाडक्या बहिणींची सेवा आम्हीही करू, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.