नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
'अदृश्य शक्ती देश चालवू शकणार नाही, हे महाराष्ट्राने दाखवून दिलं आहे. हा देश संविधानाने चालतो अदृश्य शक्तीने नाही. सरकार स्थापनेसाठी यांनी घर, पक्ष फोडला. अदृश्य शक्तीने आमच्याकडून पक्ष चिन्ह काढून नाही तर ओरबाडून घेतलं. इडी, सीबीआयचा गैरवापर करून पक्ष फोडण्याचं काम या सरकारने केलं.' असा हल्लाबोल सुप्रिया सुळे यांनी भाजपावर केला आहे.
advertisement
दरम्यान पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, वक्फ बोर्डाबाबत आमची भूमिका स्पष्ट असून, अजित पवारांनी संसदेत अद्याप त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट केलेली नाही. आम्ही जेपीसीची मागणी केली आहे. जर अदृश्य शक्तीने संबंधित व्यक्ती, तसेच संस्थांचा विचार न करता जर कोणता निर्णय घेतला तर आम्ही पूर्ण ताकदीने त्यांचा विरोध करणार असल्याचं सुळे यांनी म्हटलं आहे.
यावेळी प्रेमाने, सन्मानाने, संविधानाने जर त्यांनी निर्णय घेतला तर आम्ही त्यांचं स्वागत करू. जर त्यांनी संविधानाची चौकट ओलांडून दडपशाही करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ही दडपशाही सहन करणार नाही असा इशाराही यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारला दिला आहे.