दिंडोरी लोकसभा मतदारसंघ सलग तीन वेळा भाजपच्या ताब्यात होता. भाजपने विद्यमान खासदार भारती पवार यांना पुन्हा उमेदवारी दिली. भारती पवार या केंद्रात मंत्री आहेत. मात्र, भगरे हेदेखील काँटे की टक्कर देताना दिसले. अखेर भगरे यांनी मोठ्या मताधिक्याने येथे विजय मिळवला.
Nashik Loksabha Result : नाशिककरांची कोणाच्या शिवसेनेला साथ? मशाल पेटली की बाण चालला? पाहा निकाल
advertisement
निफाडमध्ये शरद पवार यांची सभा घेऊन महाविकास आघाडीने अगोदरच मुसंडी मारली होती. त्यात कांद्या निर्यातबंदीसह केंद्र शासनाच्या शेती विरोधी धोरणाची धग शेतकऱ्यांच्या मनात कायम राहीली. गेल्या तीन निवडणुकांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात इथे चुरशीची स्पर्धा झाली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने भास्कर भगरे यांना तिकीट दिलं. यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्काही वाढला आहे. याचा फायदा भगरे यांना झाला असल्याचंही आता समोर येत आहे.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या सहा जागा आहेत. सहापैकी 4 जागा राष्ट्रवादीकडे आहेत. एका जागेवर भाजपचा तर एका जागेवर शिवसेनेचा आमदार आहे.