स्टेजवरच्या सर्व उमेदवारांनी फक्त भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांसाठीच मत मागावी, माझा भाऊ जरी शिवसेनेमध्ये किंवा राष्ट्रवादीमध्ये असता तरी मी केवळ कमळासाठीच मतदान मागितले असते, असा टोला खासदार बोंडे यांनी नवनीत राणा यांना लगावला.
नवनीत राणा-खासदार बोंडेमध्ये तू तू मैं मैं
त्यावर नवनीत राणा यांनी देखील आपल्या भाषणातून खासदार अनिल बोंडे यांना पालकमंत्र्यांसमोरच सुनावले. अनिल बोंडे यांच्यावर लोकसभा निवडणुकीदरम्यान वर्धा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रामदास तडस यांचा प्रचार न केल्याचा ठपका होता. हाच मुद्दा पकडून त्यांनी टोलेबाजी केली. अनिल बोंडे भाऊ मी देखील मोर्शी फिरून आली आहे. मोर्शीमध्ये माझी सभा झाली आहे. कोणालाही बोलण्याची गरज नाही, असे म्हणत त्यांनी बोंडेंना चिमटे काढले. बावनकुळेंसमोर नवनीत राणा यांनी अनिल बोंडे यांना सुनावल्याने पक्षांतर्गत वाद उफाळून आल्याची चर्चा आहे.
advertisement
भगव्यासोबत बेइमानी करणाऱ्याला सोडणार नाही- नवनीत राणा
लोकसभा निवडणुकीत भाजप नेत्यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात प्रचार केला होता. तर भाजपचे महापालिकेचे उमेदवार तुषार भारतीय यांनी रवी राणा यांच्या विरोधात बडनेरामध्ये बंडखोरी केली होती. अमरावतीची एक जागा नाही आली तरी हरकत नाही असे त्यावेळी काही भाजप नेते सांगत होते. त्याचाही नवनीत राणा यांनी खरपूस समाचार घेतला. यामुळे आता भाजपमध्ये राणा दाम्पत्य विरुद्ध इतर भाजप नेते असे चित्र निर्माण झाले आहे. हाच धागा पकडून भगव्यासोबत बेइमानी करणाऱ्याला सोडणार नाही, असे राणा म्हणाल्या.
