गुरूवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास जालना शहरातील सरस्वती भुवन आणि शनी मंदिर परिसरात तसेच काली मज्जिद परिसरात मतदान करण्यासाठी बाहेर पडलेल्या काही मतदारांवर आणि नागरिकांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला.
एका मागोमाग एक या कुत्र्याने नागरिकांना चावा घेतला आहे. कोणाचे पायाचे लचके तोडले, तर एकाच्या हाताचा करंगळी तोडून या पिसाळलेल्या कुत्र्याने जखमी केले आहे. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
मतदानासाठी बाहेर पडलो. मागून एक कुत्रा आला. बायकोला चावला. जवळपास १५ ते २० लोकांना कुत्र्याने चावा घेतला आहे. काही लहान मुलांना देखील कुत्र्याने जखमी केले आहे. सगळ्यांना दवाखाखान्यात आणले आहे, असे एकाने सांगितले.
तर कुत्र्याने हल्ला केलेल्या जखमींवर उपचार सुरू आहेत. जवळपास १२ ते १५ जखमींवर आम्ही प्राथमिक उपचार केले आहेत. अॅडमिट करून त्यांना इंजेक्शनही देतोय. जखमींची प्रकृती स्थिर आहे. फक्त एका रुग्णाचे एक बोट तुटले आहे. कुत्र्याने गंभीर रित्या चावा घेतलेला आहे, असे डॉ. आशिष देवडे , जिल्हा रुग्णालय जालना यांनी सांगितले.
