पृथ्वीवरील नंदनवन अर्थात जम्मू काश्मिरमधील पहलगाम येथे मे महिन्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ निष्पाप नागरिक मारले गेले. पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर मोहीम यशस्वी करून पाकिस्तानने पोसलेले दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. तसेच पाकिस्तानची राजनैतिक कोंडी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन भारतीय शिष्टमंडळांनी पाकची दहशतवादी मानसिकता समोर आली. पहलगाम हल्ल्यापासून दोन्ही देशांचे संबंध कमालीचे ताणलेले असतानाही पाकिस्तानने भारतात कंटेनर कसे पाठवले, असा सवाल उपस्थित होतोय.
advertisement
खुष्कीच्या मार्गाने PAK चे ३९ कंटेनर मुंबईत, आतमध्ये काय सापडलं?
महसूल गुप्तचर संचालनालयाने नवी मुंबई बंदरावरून ३९ पाकिस्तानी कंटेनर जप्त केले. या कंटेनरमध्ये जवळपास ९ कोटी रुपयांचे सामान होते. खारीक आणि इतर काही पदार्थांची पोती कंटेनरमध्ये होती. थेट निर्यात बंद असल्याने पाकिस्तानने दुबईमार्गे भारतात कंटेनर पाठवल्याची प्राथमिक माहिती आहे. पाकिस्तानचे कंटेनर दुबईमार्गे भारतात येत असल्याची माहिती महसूल गुप्तचर संचलनालयाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे छापेमारी करून महसूल गुप्तचर संचलनालयाने ३९ कंटेनर जप्त केले आहेत.
जवाहरलाल नेहरू बंदर
जवाहरलाल नेहरू बंदर, ज्याला न्हावा शेवा बंदर म्हणूनही ओळखले जाते, हे भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर आहे. मुंबईच्या पूर्वेला, महाराष्ट्र राज्यातील जेएनपीटी भारतातील बहुतेक कंटेनरयुक्त व्यापार हाताळते.