निवडणुकांच्या या रणधुमाळीमध्ये राज्य शासनाने ड्राय डेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. या कालावधीमध्ये राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या क्षेत्रामध्ये दारूची सगळी दुकानं, बार आणि परमिट रूम बंद राहणार आहेत. तसंच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यासही सक्त मनाई आहे, असं शासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रचाराच्या तोफा या मंगळवार 13 जानेवारीला थंडावणार आहेत. याच दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यापासून दारूची दुकानं बंद राहणार आहेत. याशिवाय 14 जानेवारीचा पूर्ण दिवस आणि 15 जानेवारीचा मतदानचा पूर्ण दिवस दारूची दुकानं बंद राहतील. त्यानंतर मतमोजणी म्हणजेच शुक्रवार 16 जानेवारीला निकाल जाहीर होईपर्यंत दारूची दुकानं बंद राहणार आहेत. मंगळवार 13 जानेवारीपासून ते 16 जानेवारीला मतमोजणी पूर्ण होईपर्यंत चार दिवस दारूची दुकाने बार आणि परमिट रूम बंद राहणार आहेत.
advertisement
ड्राय डे चं वेळापत्रक
1. मंगळवार, 13 जानेवारी 2026 (सायंकाळी 6:00 वाजल्यापासून)
2. बुधवार, 14 जानेवारी 2026 (पूर्ण दिवस)
3. गुरुवार, 15 जानेवारी 2026 (मतदानाचा दिवस - पूर्ण दिवस)
4. शुक्रवार, 16 जानेवारी 2026 (मतमोजणी दिवस - निकाल जाहीर होईपर्यंत)
