TRENDING:

Eknath Khadse: एकनाथ खडसेंच्या घरात चोरी करणारे 2 जण अटकेत, सोनं-चांदीचे दागिने जप्त, CD-पेन ड्राईव्हचं काय?

Last Updated:

या घरफोडीतील मुख्य आरोपी एजाज अहमद, मोहम्मद बिलाल आणि बाबा हे अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विजय वाघमारे, प्रतिनिधी
advertisement

जळगाव:  राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या घरामध्ये झालेल्या चोरी प्रकरणी अखेरीस पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. पण ३ मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. या आरोपींकडून चोरीचे सोने-चांदी दागिने जप्त करण्यात आले आहे. मात्र, खडसेंनी आरोप केलेले कागदपत्रं, सीडी आणि पेन ड्राईव्ह सापडले नसल्याचं समोर आलं आहे.

advertisement

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगाव येथील घरात झालेल्या चोरीप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. अटक आरोपींमध्ये उल्हासनगर येथील चिराग सय्यद आणि कैलास खंडेलवाल या दोघांचा समावेश आहे. चोरांनी  खडसेंच्या घरात चोरी केली होती. चोरीनंतर आरोपींनी चोरलेला मुद्देमाल चिराग सय्यद याच्याकडे दिला होता, ज्याने तो पुढे कल्याण येथील  एका सराफ व्यवसाय करणाऱ्या कैलास खंडेलवालकडे विकला होता. मात्र, या घरफोडीतील मुख्य आरोपी एजाज अहमद, मोहम्मद बिलाल आणि बाबा हे अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

advertisement

सीडी-पेन ड्राईव्ह सापडलं नाही!

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडण्याचं धाडस केलं अन् सुरू केलं केक शॉप, आज मनाली वर्षाला कमावते 24 लाख!
सर्व पहा

एजाज अहमद याच्याविरुद्ध वेगवेगळ्या राज्यांमध्ये तब्बल 25 ते 26 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली. खडसे यांच्या घरातून चोरी गेलेले सोने आणि चांदीचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. मात्र, कोणतीही कागदपत्रे, सीडी किंवा पेन ड्राईव्ह सापडलेली नाहीत. तसंच खडसे यांनी एफआयआरमध्ये अशा वस्तू चोरीला गेल्याचा उल्लेख केलेला नाही तसंच पुरवणी जबाब देखील दिलेला नसल्याचंही पोलीस अधीक्षक रेड्डी यांनी स्पष्ट केलं आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Eknath Khadse: एकनाथ खडसेंच्या घरात चोरी करणारे 2 जण अटकेत, सोनं-चांदीचे दागिने जप्त, CD-पेन ड्राईव्हचं काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल