TRENDING:

Eknath Shinde Ravindra Chavan: व्यासपीठावर केमिस्ट्री दिसली पण भाषणात सूर जुळेना, शिंदे-चव्हाण एकाच मंचावर, नेमकं घडलं काय?

Last Updated:

Eknath Shinde Ravindra Chavan :शनिवारी झालेल्या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी ऑल इज वेल दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाषणातून खदखद बाहेर आल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.

advertisement
कल्याण-डोंबिवली: ठाणे आणि कल्याण–डोंबिवली महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या फोडाफोडीच्या राजकारणानंतर शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे अखेर एका व्यासपीठावर आले. माागील काही आठवड्यांपासून दोन्ही पक्षांमध्ये तणाव चांगलाच वाढला आहे. शनिवारी झालेल्या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी ऑल इज वेल दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाषणातून खदखद बाहेर आल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.
व्यासपीठावर केमिस्ट्री दिसली पण भाषणात सूर जुळेना, शिंदे-चव्हाण एकाच मंचावर, नेमकं घडलं काय?
व्यासपीठावर केमिस्ट्री दिसली पण भाषणात सूर जुळेना, शिंदे-चव्हाण एकाच मंचावर, नेमकं घडलं काय?
advertisement

डोंबिवली क्रीडा संकुलात एमआयडीसीच्या १८० कोटींच्या निधीतून उभारल्या जाणाऱ्या देशातील पहिल्या ‘व्हर्टिकल इनडोअर स्टेडियम’चे भूमिपूजन, सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचे भूमिपूजन आणि युद्धातील अवजारांच्या स्मारकाचे लोकार्पण शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. या सर्व कार्यक्रमांना रवींद्र चव्हाण उपस्थित राहिल्याने गेल्या महिनाभर तापलेल्या राजकीय वातावरणात मवाळता आल्याची चर्चा होती. उद्घाटन सोहळ्यांदरम्यान दोन्ही नेत्यांनी थेट आरोप-प्रत्यारोप टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र नंतर माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी चिमटा काढण्याची संधी सोडली नाही. “कल्याण–डोंबिवली महापालिकेत महायुतीचाच महापौर बसेल. आम्ही तोडफोडीचे नव्हे, विकासाचे राजकारण करतो,” असा टोलाही त्यांनी लगावला.

advertisement

कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विकासकामांची प्रशंसा करत व्हिजन नसताना विकास शक्य नाही, असे म्हणत कौतुक केले. विकास कामासाठी किती आणि कसा निधी आणावा याचे ज्ञान असल्यानेच त्यांनी आपल्या मतदारसंघात अनेक प्रकल्प राबवल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. तर दुसरीकडे, “केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील प्रकल्पांसाठी एमएमआरडीएकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला,” असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. थेट संघर्ष टाळत असतानाही दोन्ही बाजूंनी आपला राजकीय प्रभाव दाखवण्याचा प्रयत्न लपला नाही.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दगडूशेठ बाप्पाला 21 पालेभाज्यांची आरास, चतुर्थीचा डोळ्यांचं पारणं फेडणारा Video
सर्व पहा

गेल्या महिनाभरापासून कल्याण–डोंबिवलीत शिवसेना आणि भाजपमध्ये फोडाफोडीचे राजकारण विकोपाला गेले होते. त्याचे पडसाद राज्यभर उमटले. शनिवारी शिंदे–चव्हाण एका मंचावर आल्याने शिंदे गट-भाजपमध्ये तणाव निवळल्याचे म्हटले जात होते मात्र, दोन्ही नेत्यांनी एकमेकांना भाषणात अप्रत्यक्ष टोले लगावल्याने निवडणुकीत संघर्ष उफाळून येण्याची चिन्हे आहेत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Eknath Shinde Ravindra Chavan: व्यासपीठावर केमिस्ट्री दिसली पण भाषणात सूर जुळेना, शिंदे-चव्हाण एकाच मंचावर, नेमकं घडलं काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल