आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीआधीच शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील मतभेद तीव्र होऊ लागले आहेत. भरत गोगावले यांच्यासह महेंद्र दळवी यांनी देखील तटकरे कुटुंबावर तोफ डागली आहे. मी अनेक केसेस डोक्यावर घेऊन आमदार झालोय,त्यामुळे यापुढे कोणी आमच्या कार्यकर्त्या फोन अथवा काही बोलत असतील तर ते कदापि चालणार नाही असा सज्जड इशारा आमदार महेंद्र दळवी यांनी विरोधकांना दिला आहे. गुरुवारी, रोहा येथे आमदार महेंद्र दळवी युवा प्रतिष्ठान मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रम पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी खासदार सुनील तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यावर सडकून टीका केली.
advertisement
आमदार महेंद्र दळवी यांनी म्हटले की, मी भरत गोगावले यांचा शिष्य आहे.आम्ही वारकरी आहोत त्यामुळे समोर येताना खूप वेळ लागतो मात्र मी आता मुरूड प्रमाणे रोहा दत्तक घेतलय.आम्ही महिलांचा आदर करणारे कार्यकर्ते आहोत.मी शून्यातून वर आलेला कार्यकर्ता आहे.आणि जर का यावेळी कोणावर अन्याय झाला तर त्याच्या बाजूने उभ राहणार आहे. येणारी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूक आपल्यासाठी खूप महत्वाची असल्याचे त्यांनी म्हटले.
तटकरे घराणं खालसा करायचं...
महेंद्र दळवी यांनी म्हटले की, आपल्याला तटकरे घराणे खालसा करायचे आहे. तटकरे कुटुंब बाहेरच्या कोणा व्यक्तीला उमेदवारी देत नाहीत. सर्व काही घराण्यातच ठेवल जातं. त्यांनी फक्त आम्हाला हाय हॅलो करत राहायचं एवढंच काम त्याचं आहे असा हल्लाबोल केला. आगामी काळातील निवडणुकीची युती महायुती वगैरे होतच राहील. परंतु आमची येथे ताकद असल्याने आता आम्ही येथे वारंवार येत राहू असा इशाराही दळवी यांनी यावेळी दिला. अनिकेत तटकरे यांनी आमदार दळवी यांना चिटर म्हटलं. यावर प्रत्युत्तर देताना तुझा बाप चिटर आहे असं म्हणत हल्लाबोल केला.
रोहेकरांना आता काहीच कमी पडू देणार नाही त्यामुळे रोहा मधील जनतेने आता सज्ज व्हा अशी भूमिका आमदार दळवी यांनी यावेळी मांडली. त्यामुळे सुनील तटकरे यांच्या बालेकिल्ल्यात येऊन दळवींनी तटकरेंना हा दिलेला इशारा आगामी काळातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगळ वळण घेण्याचा तयारीत असल्याचं पहावा लागेल.