TRENDING:

Pandharpur : भाई-दादा उपमुख्यमंत्री दोन, पण शासकीय पूजेचा मानकरी कोण? विठ्ठल मंदिर समितीने दिली महत्त्वाची अपडेट

Last Updated:

Kartiki Ekadashi : राज्याला एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन उपमुख्यमंत्री असल्याने शासकीय पूजेचा मान कोणाला द्यायचा असा प्रश्न मंदिर समितीसमोर उभा राहिला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
भाई की दादा? कार्तिकी एकादशीला पूजेचा मान कोणाला? मंदिर समितीने दिली महत्त्वाची अपडेट
भाई की दादा? कार्तिकी एकादशीला पूजेचा मान कोणाला? मंदिर समितीने दिली महत्त्वाची अपडेट
advertisement

सोलापूर: आषाढी एकादशीच्या दिनी शासकीय पूजेचा मान मुख्यमंत्र्‍यांना असतो. तर, कार्तिकी एकादशीच्या दिनी हा मान उपमुख्यमंत्र्‍यांना असतो. मात्र, या वेळेस राज्याला एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन उपमुख्यमंत्री असल्याने शासकीय पूजेचा मान कोणाला द्यायचा असा प्रश्न मंदिर समितीसमोर उभा राहिला आहे.

advertisement

पंढरीतील विठ्ठल मंदिर समितीच्या आज झालेल्या बैठकीत कार्तिकी एकादशीच्या या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. त्यानुसार, कार्तिकीची पूजा शिवसेनेचे एकनाथ शिंदे की राष्ट्रवादीचे अजित पवार? यापैकी कोणत्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करायची याची विचारणा आता विधी व न्याय विभागाकडे मंदिर समितीकडून करण्यात येणार असल्याचे ठरले आहे. त्यामुळे, उपमुख्यमंत्री दोन, पण पूजेचा मानकरी कोण? अशी चर्चा पंढरीत होत आहे.

advertisement

यंदा कार्तिकी एकादशी 2 नोव्हेंबर रोजी होत असून यावर्षी कार्तिकीच्या पूजेचा मान कोणाला मिळणार हे औत्सुक्याचे असणार आहे. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज मंदिर समितीची बैठक झाली. त्यामध्ये आषाढी यात्रेप्रमाणेच कार्तिकी यात्रेलाही सर्व सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला. यंदा कार्तिकी सोहळ्यात 26 ऑक्टोंबरपासून भाविकांना 24 तास दर्शन व्यवस्था सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

advertisement

आषाढी झाल्यानंतर आता कार्तिकी एकादशीची तयारी सुरू आहे. मात्र, यंदाच्या कार्तिकी एकादशीला दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी कोणते उपमुख्यमंत्री पंढरीच्या पांडुरंगाची पूजा करणार, ह्या प्रश्नाचं कोडं मंदिर समितीला पडलं आहे. आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व कार्तिकी एकादशीची महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याची परंपरा विठ्ठल मंदिरात आहे. मात्र, राज्यात दोन उपमुख्यमंत्री असल्याने कार्तिकीची पूजा शिवसेनेचे एकनाथ शिंदे का राष्ट्रवादीचे अजित पवार? यापैकी कोणत्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करायची याची विचारणा आता मंदिर समिती विधी व न्याय विभागाकडे करणार आहे.

advertisement

कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा नेहमी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक पार पडते. परंतु मागील वर्षी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली होती. त्यामुळं विठुरायाची शासकीय महापूजा पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत कुलकुंडवार यांच्या हस्ते पार पडली होती.

2023 साली कार्तिकी एकादशी महापुजेच्या प्रश्न निर्माण झाला होता. पंढरपूर येथील मराठा आंदोलकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आरक्षणासाठी मागणी केली होती व काही मुद्दे उपस्थित केले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलकांशी चर्चेचे आश्वासन दिल्यानंतर महापुजेचा मार्ग मोकळा झाला होता व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक शासकीय महापूजा केली. यंदाच्या कार्तिकीला नेमके कोणते उपमुख्यमंत्री येणार? हे न्याय व विधी खात्याच्या सुचनेनुसार पुढील काही दिवसांत ठरेल.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
15 रुपयांला खरेदी करा अन् 30 ला विका, दिवाळीत करा आकर्षक लायटिंग व्यवसाय
सर्व पहा

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pandharpur : भाई-दादा उपमुख्यमंत्री दोन, पण शासकीय पूजेचा मानकरी कोण? विठ्ठल मंदिर समितीने दिली महत्त्वाची अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल