TRENDING:

खिशात पैसा नाही, बँकेचं कर्ज डोक्यावर; ऐन दिवाळीत शेतकऱ्याने संपवलं आयुष्य

Last Updated:

कर्जबाजारीपणाला कंटाळून व नापिकेला कंटाळून पहाटे लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अविनाश कानडजे, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील खादगाव येथे सततची नापिकीला कंटाळून एका साठ वर्षीय शेतकऱ्यांनी शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी सकाळी सात वाजता उघडकीस आली आहे, रामनाथ विश्वनाथ तानवडे वय 60 वर्षे असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. या अगोदर देखील तालुक्यातीलच एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली होती. पैठण तालुक्यातील ही दुसरी आत्महत्या आहे.

advertisement

सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेत पिकांचे मोठं नुकसान झाला आहे, शेतातील तूर मूग सोयाबीन हे पिके खराब झाले आहेत, उर्वरित कपाशीमध्ये दिवाळी साजरी करता येईल अशी आशा होती. मात्र दिवाळीच्या दिवशीच पावसाने हजेरी लावली त्यामुळे शेतातील पिके ही खराब झाले आहे. कपाशीच्या वाती वळल्या गेल्या आहेत, तसेच बँकेतून घेतलेले कर्ज फेडायचे कसे अशा विवंचनेत यंदा पडले होते.

advertisement

पाचोड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद

शासकीय बँकेचे 50 हजार रुपये पीक कर्जही होतं, काही हात उचले ही पैसे होते त्यामुळे कर्जबाजारीपणाला कंटाळून व नापिकेला कंटाळून पहाटे लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

शेतकरी आत्महत्यांचे दुष्टचक्र अजूनही कायम

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दिवाळीतील गोड पदार्थासोबत चटपटीत खायचंय? घरीच बनवा केळीचे चिप्स, रेसिपीचा Video
सर्व पहा

मागील काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती, पिकांवरील रोग व त्यातच शेतमालाच्या पडलेल्या किमतीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. हे वर्ष चांगले जाईल अशी अपेक्षा असताना अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले. शासनाची मदत मिळत असली तरी झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात ती अत्यंत तोकडी असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे. या घटनांमुळे शेतकरी आत्महत्यांचे दुष्टचक्र अजूनही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
खिशात पैसा नाही, बँकेचं कर्ज डोक्यावर; ऐन दिवाळीत शेतकऱ्याने संपवलं आयुष्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल