रोगनियंत्रणासाठी औषध फवारणी अपरिहार्य असली तरी सतत पावसाने ती फवारणी करणे अशक्य झाले. सतत पडणाऱ्या पावसाने शेतात आलेले भात पाण्याखाली गेल्याने शेतकरी चिंतेत आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही शेतकऱ्यांनी शेतीसाठी कर्ज घेतले. पिक चांगल्या प्रकारे पिकल्यानंतर शेतकरी तेच धान्य बाजारात विकून येणाऱ्या पैशातून कर्ज फेडत असतात. परंतु यावर्षी ना पैसे ना धान्य त्यामुळे शेतकरी अधिक चिंतेत आहेत.
advertisement
ठाणे जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये ही परिस्थिती पहाता दिवाळी नंतर शेतकऱ्यांचेच दिवाळे निघाले आहे. परतीच्या मुसळधार पावसाने ठाणे जिल्ह्यातील कल्याण, मुरबाड, शहापूर, भिवंडी पट्ट्यातील शेतकऱ्यांचे हाता तोंडाशी आलेले भाताचे पीक भुईसपाट झाले आहे. मुसळधार पावसामुळे शेतामध्ये गुडघाभर पाणी आहे. त्यात भातपीके शेतात पाऊस, वाऱ्याने कोलमडली आहेत. त्यामुळे भाताच्या तुऱ्यामधील दाणा, खोडाचा (पोटरी) नवजात दाणा खराब होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
सध्याच्या घडीला शेतात पडलेला दाना भाताचे नवीन रोप आलेले चित्र दिसते. परंतु नोव्हेंबर महिना आला तरी भात शेतातच असल्याने जे कडधान्य ऑक्टोबर महिन्यात लावले जातात ते अजून ही त्यांची पेरणी न केल्याने ते ही यावर्षी फुकट गेले त्यामुळे यावर्षी भातापासून कडधान्य पर्यंत सर्वच फुकट गेला. यामुळे बाजार भावानुसार तांदळाचे भाव मागच्या वर्षी पेक्षा दुप्पट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे होणारे भात शेतीचे नुकसान पाहता हे संकट एकट्या शेतकऱ्याच नसून याचा फटका महाराष्ट्रातील तांदळाचे भात भाकरी खाणाऱ्यांना ही भोगावं लागणार आहे.
आज ही शेतकऱ्यांच्या नजर आकाशाकडे वेधले आहे. वर्षाच पूर्ण झालेलं धान्य आज पूर्ण चिखळाला विलीन झालं आहे. शेतकऱ्याला प्रश्न पडले भात भरडायला कणसे न्यायची का तण त्यामुळे तांदळाचे भाव दुप्पट होण्याची शक्यता आहे.