मुंबई मोर्चाच्या संदर्भात मनोज जरांगे पाटील नांदेड दौऱ्यावर आहे. सकाळपासून मराठा बाधवांच्या बैठका त्यांनी घेतल्या. बैठक सुरू असताना अचानक त्यांना चक्कर आली. तातडीने डॉक्टाराना पाचारण करण्यात आलं. डॉक्टर तपासणी करून त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला. त्यानंतर जरांगे यांनी मराठा बांधवांशी संवाद साधला.
'सकाळपासून नांदेडमध्ये बैठका सुरू होत्या. अचानक घाम आला आणि चक्कर आली. सततचे उपोषण आणि उपाशी राहिल्याने अशक्तपणा आला. शरीर झिझलं. शरीरात खूप अशक्तपणा आहे. ह्या उपोषणाच्या वेदना आहेत पण मी हटत नाही. मी समाजाला माझं दुःख सांगत नाही. मला समाजाची पोर बाळ मोठी करायची आहेत. शेवटच्या श्वासापर्यंत लढणार. काहीही झालं तर शेवटची 29 ची लढाई मी लढणार आहे आणि जिंकून मराठ्यांना आरक्षण मिळवून देणार आहे. डॉक्टरांनी सलाईन लावण्याचा प्रयत्न केला पण सलाईन लागली नाही. सुया टोचून टोचून शरीर जरजर झालं.मला उभ राहता येत नाही, असं मनोज जरांगे यांनी सांगितलं.
advertisement
'सरकारला माझ्या सगळ्या मागण्या माहीत आहेत. त्यांना जाणून बुजून मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही. मराठा समाजाच कसं वाठोड होईल, मराठा समाज कसा संपेल याचा विडा देवेंद फडणवीस यांनी उचलला आहे, मी पण खमक्या आहे, कच्चा नाही. 29 ला मी आणि समाज जाणार मुंबईला. मग बघू सरकारमध्ये किती दम आहे. 29 ऑगस्टलाच आरक्षण मिळवून देणारं. समाजाला आवाहन आहे. माझं दुखत असताना मी ठाम आहे. मोठया संख्येने या ही लढाई शेवटची आहे. एकाही मराठ्याने घरी थांबायचं नाही, असं आवाहनही जरांगेंनी केलं.
'भाजप आमदार-खासदारांचाही पाठिंबा'
'मी सांगू शकत नाही. त्यांच्या मनात पण खदखद आहे. कारण फडणवीस यांना मराठ्यांनी सत्तेवर बसवलं. मराठ्यांशिवाय सत्ता येणे शक्य नाही. भाजपच्या आमदार, खासदारांना निवडून दिलं. आज तिच माणस म्हणताय मी ओबीसीसाठी लढणार. मराठ्यांसाठी लढणार नाही. मुंबईत आले तर पोलीस बघून घेतील असं फडणवीस यांचं वक्तव्य आहे. त्या दिवसांपासून मराठे चिडले. आता मराठे म्हणत आहेत बघू कोण रोखते आम्हाला, हीच परिस्थिती भाजपातील मराठ्यामध्ये आहे, असा दावाही जरांगेंनी केला.
'मुंबईतून येताना मराठा आरक्षण आणणारच'
- मी तसा विचार केला नाही. मी थकलो तरी जाणार, माझ्या शरीराला किमत नाही. मेलो तरी चालेल. मी निघाल्यावर सगळे मराठे येतील. 29 ला मराठे घरी राहणार नाहीत. मोठ्या प्रमाणात बाहेर निघतील. पाचपट गर्दी असेल. येताना आरक्षण घेऊन येणारं आणि टिकणार घेऊन येणार, कोणाचाही बाप आडवा येऊ दे. मराठयापुढे निभाव टिकू देणारं नाही, असा दावाही जरांगेंनी केला.
