या छोट्याशा स्टॉलची सुरुवात झाली ती अत्यंत साध्या पद्धतीने पण चवीच्या जोरावर या दुकानाने अनेकांच्या जिभेवर अधिराज्य गाजवले. आजही फक्त 20 रुपयांत मिळणारा हा गरमागरम वडापाव मुंबईकरांच्या मनात आणि पोटात आपले खास स्थान टिकवून आहे. कॉलेजला धावणारे विद्यार्थी असोत, ऑफिसहून थकून परतणारे प्रवासी असोत, की संध्याकाळी मित्रमैत्रिणींसोबतचा गप्पांचा कार्यक्रम, पार्लेश्वर वडापाव हे नेहमीच त्या क्षणांना चवदार बनवतो.
advertisement
विदर्भातील फेमस कुरकुरीत बिट्टी कशी तयार करायची? सोपी रेसिपी, झटपट तयार होणार, VIDEO
या वडापावची खरी खासियत म्हणजे त्याचा साधेपणा आणि सातत्य. सुगंधी बटाट्याच्या भरडीतून तयार होणारा गरम वडा, मऊ लादी पावात वडा ठेवून त्यावर लाल आणि हिरव्या चटणीचा परिपूर्ण संगम ही चव गेल्या तीन दशकांपासून तशीच टिकून आहे.
मराठी कलाकारांनी वडापावचा आस्वाद घेतलाला आहे. अभिनेते आदेश बांदेकर आणि गायिका फाल्गुनी पाठक यांसारख्या नामवंत व्यक्तींनीही येथे येऊन या चवीचं कौतुक केलं आहे. त्यांच्या भेटींमुळे या साध्या स्टॉलला एक वेगळं स्थान मिळालं पण दुकानमालक मात्र आजही त्या जुन्या नम्रतेने ग्राहकांचे स्वागत करतात.
आजही विलेपार्ल्याच्या गल्लीबोळांतून वाहणारा त्या वडापावचा सुगंध प्रत्येकाला थांबवतो. पार्लेश्वर वडापाव हा केवळ एक स्नॅक नाही तर तो मुंबईच्या मेहनतीचा, साधेपणाचा आणि चवीचा प्रतीक बनला आहे. एक अशी चव जी 35 वर्षांनंतरही तितकीच ताजी, मोहक आणि अविस्मरणीय आहे.





