मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील घोडबंदर रोडवरील हिरानंदानी इथं एका सोसायटीच्या इमारतीला आग लागली.
सोसायटीच्या वरच्या मजल्यावर एक फ्लॅटला आग लागली. घटनेची माहिती मिळताच हिरानंदानी टॉवरमधील व्यवस्थपाकाकडून तातडीने मदतकार्य सुरू झालं. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.
advertisement
दरम्यान, इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर ही आग लागली आहे. संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. फटाके फोडल्यामुळे ही आग लागली की, इतर काही कारण होतं, हे मात्र, अद्याप कळू शकलं नाही. सुदैवाने या घटनेत अद्याप कोणती जीवितहानी झाली नाही, अशी माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच ठाणेआपत्ती व्यवस्थापन आणि ठाणे अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे ऐन दिवाळीत परिसरात घबराट पसरली होती.