जायकवाडी धरणावर 10 ते 12 हजार एकरात सौर ऊर्जा प्रकल्प होणार आहे. या जायकवाडी धरणाच्या पाण्यावर हजारो कुटुंबीय मासेमारी करतात. त्यामुळे हा सौर ऊर्जेच्या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आज हजारो मासेमारी करणारे नागरिक छत्रपती संभाजीनगरमधील रस्त्यावर उतरले आहेत. पाण्यावर तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रेडिएशन तयार होऊन आसपासच्या परिसरातील लोकांना शंभर टक्के कॅन्सरचा धोका निर्माण होणार आहे. सौर ऊर्जा प्रकल्पामुळे पाण्यात त्याचे रेडिएशन होऊन नैसर्गिक मत्स्य उत्पत्ती होणार नाही. त्यामुळे मत्स्यबीज उत्पत्ती न झाल्यास जलाशयातील मत्स्य संपूर्ण संपुष्टात येईल, असा दावा आंदोलकांनी केला.
advertisement
मागील बऱ्याच दिवसापासून जायकवाडी धरणावर तरंगत्या सोलारचा प्रोजेक्ट होईल, असे भाजपाचे तत्कालीन केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी सांगितले होते. त्यानंतर मच्छीमारांचा मोठा विरोध झाला होता. त्यानंतर हा प्रोजेक्ट होईल का अशा चर्चा होत्या. मात्र आज भागवत कराड यांनी पुन्हा हा प्रोजेक्ट होणार असल्याचे सांगितले. 5 जिल्ह्यातील शेतकर्यांच्या शेतीला पाणी जायकवाडी धरणातून पुरवले जाते. पिण्यासाठी सुद्धा पाणी पुरवले जाते. या धरणावर केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून फ्लोटिंग सोलरचा प्रकल्प मंजूर झाला आहे. 1342 मेगा व्हॅट निर्मिती या प्रोजेक्टमधून असेल, महाराष्ट्रातील नव्हे जगातील सर्वात मोठा हा प्रोजेक्ट असेल.
1342 मेगा व्हॅट वीज दिवसा तयार होईल, ती वीज महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी उद्योगांसाठी आणि वापरता येईल, पावर परचेस एग्रीमेंट येत्या काही दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात होईल. हा प्रकल्प महाराष्ट्राच्या साठी एक वरदान ठरणार आहे. मच्छीमारांचे आंदोलन होते तो हा प्रोजेक्ट होऊ नये यासाठी पण टोटल क्षेत्रफळ 80 हजार एकरचे आहे. हा प्रोजेक्ट फक्त 10 ते 12 हजार एकरवर होणार आहे. 90% क्षेत्रफळ हे मच्छीमारांसाठी असणार आहे. त्यामध्ये ते त्यांचा व्यवसाय करू शकतील. अशी माहिती भागवत कराड यांनी दिली, मात्र आता मच्छीमार काय निर्णय घेतात हे देखील पहाव लागेल.
