TRENDING:

Maratha Agitation: आता थांबायचं नाय! मराठा आंदोलकांसाठी जालन्यातून चटणी-भाकरीची रसद मुंबईच्या दिशेने रवाना

Last Updated:

Maratha Agitation: मराठा समाजाची कोंडी करण्यासाठी सरकारने मुंबईतील टॉयलेट, रेस्टॉरंट्स, हॉटेल आणि खाऊ गल्ल्या बंद केल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जालना: मराठा आंदोलक मनोज जरांगे मागील तीन दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदान येथे आमरण उपोषण करत आहेत. मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसी आरक्षण मिळावं, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. आंदोलनाचा आजचा चौथा दिवस असून त्यांच्याबरोबर आलेल्या लाखो मराठा आंदोलकांचे अन्न पाण्याविना हाल होत आहेत. आंदोलकांची होत असलेली दैना बघून मराठवाड्यातील त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना अन्न पाणी पुरवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. लोकल 18च्या प्रतिनिधीने आंदोलनासाठी रसद पुरवणाऱ्या मराठा कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
advertisement

कार्यकर्ते म्हणाले की, मराठा समाजासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांच्यासह हजारो समाज बांधव मुंबईत दाखल आहेत. मराठा समाजाची कोंडी करण्यासाठी सरकारने मुंबईतील टॉयलेट, रेस्टॉरंट्स, हॉटेल आणि खाऊ गल्ल्या बंद केल्या आहेत. इतकंच नाही तर आझाद मैदानावरील लाईट देखील घालवली आहे. आझाद मैदानावर भर पावसात आंदोलकांनी रात्र जागून काढली. जिथे जागा मिळेल तिथे राहिले आणि झोपले, पण माघार घेतली नाही. या आंदोलकांची होत असलेली आबाळ पाहून उमरी, धारा, सावंगी, पाथरूड, निरखेड, भिलपुरी, मौजपुरी गावातील नागरिकांनी मिळून रसद पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक घरातून 30 ते 40 चपात्या, चटणी, ठेचा, लोणचे इत्यादी खाद्यपदार्थ मुंबईला पाठवण्याचं नियोजन केलं आहे.

advertisement

Mumbai Traffic Changes: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, बेस्ट बसचे 70 मार्ग बदलले, पर्यायी कोणते?

संपूर्ण मराठा समाजासाठी मुंबईत आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना केवळ एक-दोन दिवसांसाठी नव्हे तर वर्षभर जरी रसद पुरवावी लागली तरी देखील आम्हीही माघार घेणार नाही. आम्ही पाहिजे तितकी रसद पाठवण्यास तयार आहोत, असं उमरी येथील मराठा कार्यकर्त्यांनी सांगितलं.

advertisement

"आम्हाला जेव्हा समजलं की, मुंबईतील आमच्या बांधवांची अन्नपाण्याविना आबळ होत आहे. तेव्हा आम्ही गावातील सगळ्या महिलांना घरोघरी पीठ नेऊन दिलं आणि त्यांना पोळ्या लाटण्यास सांगितलं. पोळ्यांबरोबरच चटणी, ठेचा, लोणचं असे पदार्थही जमा केले आहेत. मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांसाठी लढत राहावे. तिथे लढणाऱ्या बांधवांसाठी आम्ही सर्व रसद पुरवण्यासाठी तयार आहोत, अशी प्रतिक्रिया एका मराठा आजोबांनी लोकल 18शी बोलताना दिली.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maratha Agitation: आता थांबायचं नाय! मराठा आंदोलकांसाठी जालन्यातून चटणी-भाकरीची रसद मुंबईच्या दिशेने रवाना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल