Mumbai Traffic Changes: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, बेस्ट बसचे 70 मार्ग बदलले, पर्यायी कोणते?
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बेस्टचे तब्बल 70 पेक्षा जास्त बसमार्ग वळविण्यात आले.
मुंबई : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बेस्टचे तब्बल 70 पेक्षा जास्त बसमार्ग वळविण्यात आले. मराठा आरक्षण आंदोलन आणि पाचव्या दिवसाच्या गणेश विसर्जनामुळे रविवारी मुंबईतील बेस्ट बस वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. आंदोलकांचा प्रचंड जमाव आणि विसर्जन मिरवणुकांमुळे बेस्टचे तब्बल 70 पेक्षा जास्त बसमार्ग वळवावे लागले, तर काही मार्ग बंदही करण्यात आले आहेत.
advertisement
कोणत्या मार्गात बदल?
सीएसएमटी, मॅडम कामा रोड, जगन्नाथ भोसले मार्ग, महापालिका मार्ग, एल.टी. मार्ग, दादर, मेट्रो सिनेमा आणि एम.जी. रोड परिसरात बस वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आले आहेत, असं बेस्ट ट्रॅफिक कंट्रोलकडून सांगण्यात आले आहे. रस्त्यांवरील गर्दी आणि पोलिसांनी केलेल्या बंदोबस्तामुळे 53, 5, 15, 82, 126, 138, 131, 103, 124 या बसमार्गांचे नियोजन बदलले आहे. काही बसेस क्रॉफर्ड मार्केट, हुतात्मा चौक, पोद्दार चौक, मेट्रो सिनेमा आणि शाहिद भगत सिंह रोडकडे वळवण्यात आल्या. तर गेट वे ऑफ इंडिया परिसरातील -112, -116 तसेच सीएसएमटी परिसरातील -138 हे मार्ग मोठ्या गर्दीमुळे पूर्णपणे स्थगित करण्यात आले. जुहू चौपाटीवरील 231 मार्गही थेट रद्द करण्यात आला.
advertisement
गणेश विसर्जनासाठी असा केला विशेष बदल
गणेश विसर्जन मिरवणुकांमुळे लालबाग, दादर चौपाटी आणि शिवाजी पार्क परिसरात मोठी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून बेस्टने खास नियोजन केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील 1, 4, 6, 7, 8, 11, 15, 19, 21, 22, 25 हे मार्ग लालबाग फ्लायओव्हर मार्गे वळवला आहे. सकाळी 6 ते 7.20 आणि दुपारी 2 ते 2.35 वाजेपर्यंत या मार्गांत बदल केला आहे.
advertisement
शिवाजी पार्क आणि विसर्जन मार्गावरून जाणार्या 72, 718, 706, 707, 709 या बसेसना गोल्डन नेस्ट मार्गे वळवले. टँक रोडवरील 612, 606, 605 या बसेसना एल.बी.एस. रोडमार्गे वळवले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Sep 01, 2025 8:30 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Traffic Changes: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, बेस्ट बसचे 70 मार्ग बदलले, पर्यायी कोणते?










