रुपलेखा ढोरे यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थांमधून केली. १९९३ ते १९९५ या कालावधीत त्यांनी मावळ पंचायत समितीच्या उपसभापतीपदाची जबाबदारी सांभाळली.
१९९५ च्या विधानसभा निवडणुकीत रुपलेखा ढोरे यांच्या राजकीय कारकिर्दीला निर्णायक वळण मिळाले. त्या वेळी त्यांनी आणि त्यांचे पती, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खंडेराव ढोरे यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपने त्यांच्यावर विश्वास दाखवत मावळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे प्रभावी नेते आणि ज्येष्ठ राजकारणी मदनशेठ बाफना यांचा पराभव करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
advertisement
या विजयासोबतच रुपलेखा ढोरे मावळ तालुक्यातील पहिल्या महिला आमदार ठरल्या,तसेच भाजपच्या पहिल्या आमदार होण्याचा मानही त्यांनी पटकावला होता.
अजित पवारांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
दिवंगत अजित पवार यांच्यावर आज बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाची बातमी समजताच राज्य सरकारकडून तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी माहिती देताना सांगितले की, अजित पवारांचे पार्थिव सायंकाळी पावणेसात ते साडेआठ या वेळेत काटेवाडी येथे नेण्यात येणार आहे. त्यानंतर बारामतीतील गदिमा सभागृहात सकाळी दहा वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येईल. सकाळी अकरा वाजता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.
