अमरावती: ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेली गळती काही थांबताना दिसत नाही. आता अमरावतीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला एका स्थानिक नेत्याने सोडचिठ्ठी दिली आहे. यामुळे अमरावतीत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख गजानन पाटील वाकोडे यांनी राजीनामा दिला आहे.
गजानन पाटील-वाकोडे शिंदेंच्या शिवसेनेत:
गजानन पाटील वाकोडे यांनी तडकाफडकी राजीनामा देत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सहसंपर्क गजानन पाटील बाळासाहेबांचे निष्ठावान शिवसैनिक होते. गजानन पाटील वाकोडे यांनी अचानक राजीनामा दिल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन त्यांनी मुंबई येथील वर्षा निवासस्थानी जात शिवसेनेत प्रवेश केला असून त्यांच्या सोबत सोबत शिवसेना नेते माजी मंत्री आनंदराव अडसूळ आणि शिवसेना राष्ट्रीय सचिव कॅप्टन अभिजीत अडसूळ उपस्थित होते.
advertisement
गजानन वाकोडे हे दर्यापूर येथील कट्टर शिवसैनिक व सहसंपर्कप्रमुख होते. त्यामुळे आगामी काळात उद्धव ठाकरेंना दर्यापूर विधानसभा मतदारसंघात फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेला काहीसा फायदा होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
ठाकरेंनी दिला भाजपाला धक्का:
दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी भाजपाला मोठा धक्का दिला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे. गोंदियाचे माजी आमदार आणि भाजपचे नेते रमेश कुथे हे आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. 2018 साली रमेश कुथे यांनी शिवसेना सोडली होती, त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ते आता पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. हा भाजपसाठी गोंदियात मोठा धक्का मानला जात आहे.
विधानसभेच्या तोंडावर उद्धव ठाकरेंचा भाजपला मोठा धक्का, नेता करणार ठाकरे गटात प्रवेश
माजी आमदार आणि भाजप नेते रमेश कुथे हे आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. आज दुपारी 12: 30 वाजता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर हा पक्षप्रवेश होणार आहे. 2018 साली रमेश कुथे यांनी शिवसेना सोडली होती आणि भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर ते आता पुन्हा एकदा घरवापसी करणार आहेत.