Maharashtra politics : विधानसभेच्या तोंडावर उद्धव ठाकरेंचा भाजपला मोठा धक्का, नेता करणार ठाकरे गटात प्रवेश
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
मोठी बातमी समोर येत आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे.
मुंबई, उदय जाधव, प्रतिनिधी : मोठी बातमी समोर येत आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे. गोंदियाचे माजी आमदार आणि भाजपचे नेते रमेश कुथे हे आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. 2018 साली रमेश कुथे यांनी शिवसेना सोडली होती, त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ते आता पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. हा भाजपसाठी गोंदियात मोठा धक्का मानला जात आहे.
माजी आमदार आणि भाजप नेते रमेश कुथे हे आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. आज दुपारी 12: 30 वाजता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर हा पक्षप्रवेश होणार आहे. 2018 साली रमेश कुथे यांनी शिवसेना सोडली होती आणि भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर ते आता पुन्हा एकदा घरवापसी करणार आहेत.
advertisement
1995 आणि 1999 अशा सलग दोन टर्म रमेश कुथे हे शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक जिंकले होते. त्यानंतर ते काही काळ राजकारणापासून दूर होते. त्यानंतर 2018 साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून ते राज्यातील भाजप नेत्यांवर नाराज होते. मध्यंतरी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली होती. त्यामुळे ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. मात्र त्यांनी आता शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 26, 2024 11:43 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Maharashtra politics : विधानसभेच्या तोंडावर उद्धव ठाकरेंचा भाजपला मोठा धक्का, नेता करणार ठाकरे गटात प्रवेश