गौरीच्या आई म्हणाली. मला संध्याकाळी सात वाजता मोबाईलवर फोन आला. म्हणाला गौरी गेली तिने फाशी घेतली. आत्महत्या केल्यानंतर गळ्याला वण असू शकतात, मात्र डोक्याला आणि छातीला आले कुठून?
लग्नानंतर एक दोन महिनेच तो ठीक राहिला नंतर तिला मारणं आणि त्रास देणे सुरूच होतं. तिला नेहमी मारहाण करायचा मी एकदा विचारलं तुला काय लागलय तर म्हणली फॅन लागलाय.. मात्र त जास्त चौकशी केल्यानंतर म्हणली अनंतने मारलं... मी कोणाला सांगितलं नाही. गौरी नेहमी मला सांगायची की त्याची तक्रार केलेली त्याला आवडत नाही. सगळं ठीक होईल तू कोणाला काही बोलू नकोस... गौरी अशी आत्महत्या करू शकत नाही. मला आणि तिच्या भावाला देखील ती नेहमी बोलायची आणि सांगायची.
advertisement
गौरीला होणाऱ्या त्रासाविषयी सांगताना गौरीची आई म्हणाल, माझं लेकरू गेलं आहे, माझ्या लेकराला न्याय भेटला पाहिजे. माझा तपासावर विश्वास नाही एसआयटी स्थापन करण्यात यावी. आज तीन दिवस होऊन देखील दोन आरोपी फरार आहेत हा कोणता तपास सुरू आहे. आम्हाला त्याचं पहिलं लग्न झाल्याची माहिती उशीरा मिळाली. आम्हाला अगोदर माहीत असते तर आम्ही लग्नचं केलं नसते. 27 वर्षे लेकराला सांभाळायचं आणि या हरामखोरांनी लेकराला जीव मारायचं आणि म्हणायचं आमचा दोष नाही. तिघांनाही फाशीपेक्षा मोठी शिक्षा झाली पाहिजे.
आत्महत्येआधी गौरी आणि अनंतचे कडाक्याचं भांडण
केईएम हॉस्पिटलमध्ये डेंन्टिस्ट असलेली गौरी हिमतीची होती.आत्महत्या करणाऱ्यातली नव्हती असं सांगत तिच्या कुटुंबानं गौरीच्या हत्येचा संशय व्यक्त केला आहे. गळफास घेतलेल्या गौरीला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर तिचा पती अनंत गर्जे फरार होता. रविवारी रात्री उशिरा तो पोलिसांना शरण गेला. रात्री 1 वाजता वरळी पोलिसांनी अनंत गर्जेला अटक केली. आत्महत्येआधी गौरी आणि अनंतचे कडाक्याचं भांडण झाल्याची माहिती अनंतनं पोलीस जबाबात दिली आहे.
