तसेच त्यांनी गौरीच्या आत्महत्येबाबत संशय व्यक्त केला आहे. गौरीने आत्महत्या केली असेल तर अनंतने तिचा मृतदेह तसाच ठेवायला हवा होता. त्याने मुलीला हात कसा काय लावला? तो डॉक्टर होता का? माझी मुलीने आत्महत्या केली होती, तर आम्ही येईपर्यंत त्याने मुलीला तसंच ठेवायला हवं होतं, अशा शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. शिवाय गौरीच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्यांना मी सोडणार नाही, असा संतापही त्यांनी व्यक्त केला. त्या न्यूज १८ लोकमतशी बोलत होत्या.
advertisement
या सगळ्या प्रकरणावर तुम्ही पंकजा मुंडेंशी संपर्क केला का? असं विचारलं असता गौरी गर्जे यांच्या आई म्हणाल्या, आम्ही त्यांच्याशी संपर्क का करावा? आमचं लेकरू गेलंय, तुम्हाला मुलगा जवळचा की सून... मला यावर काहीच बोलायचं नाही, पण माझ्या लेकराला मारलं. मला न्याय पाहिजे, मला या तिघांना शिक्षा झालेलं बघायचं आहे. मी एकालाही सोडणार नाही.
पुढील भूमिका काय असेल, असं विचारलं असता गौरीच्या आई म्हणाल्या, "आज मी पत्रकार परिषद घेणार आहे. पुढची भूमिका उद्या किंवा परवा ठरवणार आहे. जर माझ्या मुलीला न्याय मिळाला नाही, तर मी वरळी पोलीस ठाण्याबाहेर फाशी घेणार आहे. अनंत गर्जे खूप खोटं बोलतो, माझं लेकरू गेलं. आता मी तरी जगून काय करू. तू खरं बोललास तर तुला माफ करेन. पण तू खरं बोल. मला खोटं बोलणारे आवडत नाही. हा भामटा वकील लावून खोटं बोलतो, असा आरोपीही त्यांनी केला.
