विष्णू ताम्हाणे यांच्या या उल्लेखनीय कामगिरीतून केंद्र सरकारच्या फिट इंडिया मोहिमेला बळ मिळत असून, पोलिस दलासह समाजात शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीबाबत जागरूकता निर्माण करण्याचा महत्त्वाचा संदेश त्यांनी दिला आहे. सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाही त्यांनी दाखवलेली जिद्द व चिकाटी ही नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
Success Story: नोकरी सोडली, बिझनेसने तारलं; 'खरात बंधू'नी आर्थिक अडचणींवर 'आईच्या चवीने' मिळवले विजय
advertisement
ताम्हाणे नी गेल्या सहा महिन्यांपासून या स्पर्धेसाठी तयारी केली होती. त्यांना Fitness First India चे संचालक विजय गायकवाड आणि Power Peaks चे प्रशिक्षक चैतन्य वेल्हाळ यांनी प्रशिक्षण दिले. या स्पर्धेत विजय गायकवाड आणि त्यांच्या टीमनेही सहभाग घेतला. सुनील ढाकणे यांनी ही स्पर्धा 4 तास 43 मिनिटांत पूर्ण करत वेगवान भारतीय स्पर्धकाचा बहुमान मिळवला.
या दिवशी विष्णू आणि सुनीता ताम्हाणे यांचा 28 वा लग्नाचा वाढदिवस होता. स्पर्धा एकत्र पूर्ण करून त्यांनी पत्नीला दिलेली ही अनोखी भेट सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. वय कमी-जास्त असलं तरी प्रयत्न प्रामाणिक असले की लक्ष्य गाठता येतं, असे मत ताम्हाणे यांनी व्यक्त केले.
स्पर्धेनंतर ताम्हाणे पिता-पुत्र आणि कन्या तेजस्वी यांनी 15000 फूट उंचीवरून स्कायडायव्हिंग करून फिटनेस आणि कौटुंबिक एकतेचा संदेश देणारे हे कुटुंब आज अनेकांच्या प्रेरणेचे उदाहरण ठरत आहे. वडिलांसोबत 100 किमीची स्पर्धा पूर्ण करताना अंगावर काटा आला. तरुणांनी रोज किमान एक तास तरी फिटनेससाठी द्यायलाच हवा, अशी भावना गौरांग ताम्हाणे यांनी व्यक्त केली.
वडील-मुलाची ही संयुक्त कामगिरी युवांसाठी एक आदर्श आहे, असे स्वतः विष्णू ताम्हाणे यांनी सांगितले. दुबईतील या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पिता-पुत्राने केवळ सहभाग घेतला नाही, तर ती उत्कृष्टरीत्या पूर्ण करून प्रत्येकाला तंदुरुस्ती, शिस्त आणि जिद्द असेल तर वय कोणतेही असू दे, लक्ष्य गाठता येते. त्यांच्या या कामगिरीने महाराष्ट्रातील क्रीडाप्रेमी, पोलिस दल आणि तरुणाईला एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.





