मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या ज्ञानराधा बँकेत ३,५०० कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी संचालक सुरेश कुटे आणि अर्चना कुटे हे दोघेही आरोपी असून तुरुंगात मुक्कामी आहे. शनिवारी दुपारी या दोघांना केज न्यायालयातून बीडकडे घेऊन जात असलेल्या पोलीस व्हॅनला अपघात झाला.
अहमदपूर-अहिल्यानगर या रस्त्यावरी
advertisement
सुरेश कुटे आणि अर्चना कुटेंचा काय आहे घोटाळा?
बीडमध्ये ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी बँकमध्ये हा घोटाळा झाला आहे. बँकेचे संस्थापक सुरेश कुटे आणि त्यांच्या पत्नी अर्चना कुटे या दोघांनी जवळपास ३,५०० कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार केला होता. अनेक महिन्यांपासून दोघेही फरार होते. अखेरील गुन्हे शाखेनं १७ सप्टेंबर २०२५ मध्ये कुटे दाम्पत्यांना पुण्यातील बाणेर परिसरातून अटक केली होती. कुटे दाम्पत्याने जवळपास बँकेतील ४ लाख गुंतवणूकदारांची फसवणूक केली. बँकेतील पैसे हे त्यांनी आपल्याा मालकीच्या असलेल्या कुटे ग्रुपमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांना कर्ज दिले होते. या दाम्पत्यावर मनी लाँड्रिंगचाही आरोप झाला आहे. या प्रकरणाचा ईडीने तपास करत आहे. ईडीने मागील वर्षीच जानेवारी २०२५ मध्ये सुरेश कुटेंना अटक केली होती. त्यानंतर जामिनावर बाहेर आल्यानंतर हे दाम्पत्याला अटक करण्यात आली असून या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.
