नेरळ- माथेरान ट्रेन सुरूवात होणार असल्याची अपडेट आदिश पठानिया यांनी माध्यमांना दिली आहे. अखेर अनेक दिवसांच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर ही मिनी टॉय ट्रेन सुरू होत आहे. त्यामुळे आता येत्या 6 नोव्हेंबरपासून माथेरानमध्ये पर्यटकांची गर्दी होणार आहे. माथेरानमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मिनी ट्रेनच्या मार्गावर अनेक ठिकाणी माती वाहून गेली आहे. कड्यावरचा गणपती भागामध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालं आहे. त्यामुळे रेल्वे ट्रॅकखाली भागात सुरक्षा भिंत उभारण्याचं काम सुरू आहे. अचानक येत असलेल्या पावसामुळे कामाचा वेग मंदावला आहे. मात्र लवकरच याचं काम पूर्ण होईल असं सांगितलं जात होतं. आता अखेर ही मिनी टॉय ट्रेन सुरू झालेली आहे. मोठ्या ब्रेक नंतर का होईना आता ही टॉय ट्रेन सुरू झालेली आहे.
advertisement
1907 साली ब्रिटीश काळात सर आदमजी पिरभाय यांनी माथेरानात मिनी ट्रेन सुरू करण्यात आली होती. दरवर्षी 14 जून रोजी पावसाळ्यात ट्रेन बंद करण्यात येते आणि साधारण दसऱ्याच्या वेळी ही ट्रेन सुरू होते. मात्र यंदा उशीरापर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे मिनी ट्रेन सुरू व्हायला तब्बल एक महिना उशीर झाला आहे. उन्हाळा आणि हिवाळा अशा दोन्हीही ऋतूंमध्ये ही टॉय ट्रेन सुरू राहते. माथेरानला मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची ये- जा असते. यामुळे माथेरानच्या पर्यटनाला ट्रेनमुळे मोठी मोठी चालना मिळते. परंतु यंदा अनियमित हवामानामुळे शिरस्ता मोडीत निघाल्याने पर्यटक आणि व्यापारी नाराज आहेत. मे महिन्यातच सुरू झालेला पाऊस ऑक्टोबर संपायला आला तरी सुरूच आहे.
