पद्मभूषण वसंतदादा पाटील सहकारी सुतगिरणी, जवळा येथील विद्याविकास मंडळ तसेच बळीराजा फलोत्पादक संघ आदींवर कार्यरत आहेत. या संस्थांमध्ये शासकीय निधीचा अपहार, अवैध जमिनी व्यवहार, बँक फसवणूक आणि धर्मादाय कायद्याचे उल्लंघन केले आहे. 93 लाखांचा भूसंपादन मोबदला बोगस संचालक मंडळाने सांगोला शाखेतील महाराष्ट्र बँकेत खोट्या ठरावावरून जमा करून लंपास केला, असा देशमुख यांचा आरोप आहे.
advertisement
उच्चस्तरीय चौकशी व गुन्हा नोंदणीची मागणी
तसेच, विद्याविकास मंडळाच्या मालकीच्या जमिनीवर धर्मादाय आयुक्तांची पूर्वपरवानगी न घेता पाच कोटी रुपयांचे कर्ज घेतले. ती रक्कम निवडणुकीत वापरली, असा आरोप त्यांनी केला. याशिवाय, साळुंखे यांच्या पत्नी रुपमती साळुंखे-पाटील यांनी चुकीच्या उत्पन्न दाखल्यावर स्वस्त धान्य दुकान मिळविल्याची बाब उघड झाली आहे. या सर्व घटनांनी सांगोला-पंढरपूर-माढा या मतदारसंघात राजकीय समीकरणे ढवळून निघाली आहेत. विरोधी पक्षांनी साळुंखे कुटुंबाविरुद्ध भ्रष्टाचार थांबवा मोहिमेची तयारी सुरू केली असून, काही स्थानिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी व गुन्हा नोंदणीची मागणी केली आहे.
एक महिना चौकशी पण गुन्हा दाखल नाही
दरम्यान, पोलिसांकडून एक महिन्याहून अधिक काळ चौकशी सुरू असूनही अद्याप गुन्हा नोंद झालेला नाही. आता केलेले घोटाळे वाचवण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, साळुंखे यांचा घोटाळेबाज चेहरा पक्ष नेतृत्वाच्या निदर्शनास आणून दिल्याचे ते म्हणाले. पक्ष नेतृत्वाने याची दखल घ्यावी, अशी मागणी श्रीकांत देशमुख यांनी यावेळी केली.